pune mumbai expressway traffic jam Saam tv
मुंबई/पुणे

पुणे-मुंबई महामार्गावर भयंकर कोंडी; पोटात अन्नाचा कण नाही; प्रवाशांनी रस्त्यावर चूल मांडली

pune mumbai expressway traffic jam : वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांनी रस्त्यावर चूल मांडली. २४ तास उलटल्यानंतर देखील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका झालेली नाही.

Vishal Gangurde

पुण्याच्या आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटल्याने हायवे बंद झालाय

महामार्गावर 15–20 किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात

पुणे–मुंबई एसटी बसच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्यात

पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर असलेल्या आडोशी बोगद्याजवळ टँकर उलटल्याने काल रात्रीपासून वाहतूक ठप्प झाली आहे . वाहतूक कोंडीमुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुण्यातील सर्व एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. बस फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवासी खोळंबले आहेत. गेल्या दीड ते दोन तासांपासून प्रवासी एसटी बसची वाट पाहत आहेत. कंटेनर, ट्रकच्या चालक, क्लिनर कालपासून महामार्गावर वाहतूक कोंडीत अकडले आहेत. या वाहतूक कोंडीमुळे काही चालक आणि प्रवाशांनी रस्त्यावर स्वयंपाकासाठी चूल मांडली आहे.

पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे प्रवासी रडकुंडीला आले आहेत. अनेक प्रवासी प्रशानावर टीका करू लागले आहेत. वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या सर्व एस टी बसच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस टँकर उलटल्यानंतर गळती सुरू झाल्याने प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. यामुळे पुढील काही तासांसाठी बसेस फेऱ्या बंद राहणार आहेत.

महामार्गांवर प्रवाशांचे हाल, नेमकी परिस्थिती काय?

पुणे-मुंबई हायवेवर मार्गावरील परिस्थिती २४ तासानंतर जैसे थे आहे. आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आली. वाहनांच्या तब्बल 15 ते 20 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. गॅस टँकरमधून लिकेज सुरूच असल्याची माहिती मिळत आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने एक लेन आणि मुंबईहून पुण्याच्या दिशेने दोन लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या होत्या.

पर्यायी मार्ग काय?

लोणावळा-खंडाळा मार्ग पूर्णपणे टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रशासनाने पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आलेत. या पर्यायी मार्गांमुळे प्रवास करण्याची वेळ ३ ते ५ तासांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनधारकांनी पुरेसे इंधन आणि पाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

ताम्हिणी घाट मार्ग: पुणे → पौड → ताम्हिणी घाट → माणगाव → मुंबई (दक्षिण मुंबईत जाणाऱ्यांसाठी).

माळशेज घाट मार्ग: पुणे → चाकण → नारायणगाव → माळशेज घाट → कल्याण/ठाणे (उपनगरांकडे जाणाऱ्यांसाठी)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना पीएम किसानचा २३वा हप्ता कधी येणार? या दिवशी जमा होऊ शकतात ₹२०००

Maharashtra News Live Update: ईडीकडून भोंदू अशोक खरातच्या प्रॉपर्टीची सखोल चौकशी सुरू

Asha Bhosle Funeral: एका युगाचा अंत! आशा भोसलेंच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

Tandalachya Kurdaya Recipe: उन्हाळ्यात खास बनवल्या जाणाऱ्या कुरकुरीत तांदळाच्या कुरडया कश्या बनवायच्या ?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आदिती तटकरेंचे खास ट्वीट, ईकेवायसीवर म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT