Traffic Jam On Mumbai-Pune Express Way Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Express Way : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, लोणावळ्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा

Traffic Jam On Mumbai-Pune Express Way: या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत.

Priya More

Lonavala News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune Express Way) मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. लोणावळा घाटात मुंबईच्या दिशेला येणाऱ्या मार्गिकेवर ही वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विकेंड असल्यामुळे अनेक जण फिरण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळ्याजवळ वाहतूक कोंडी झाली आहे. शनिवार आणि रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे अनेक जण बाहेरगावी आणि पर्यटनस्थळी जाण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. त्यात अनेक जण आपल्या खासगी वाहनाने निघाल्याने वाहनांच्या संख्येत वाढ झाली असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. लोणावळ्याजवळ वाहनांची मोठी रांग लागली आहे.

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी किलोमीटर 40 म्हणजेच आडोशी बोगद्याजवळ महामार्ग पोलिसांकडून 10-10 मिनिटांचे ब्लॉक घेऊन गाड्या विरुद्ध दिशेने सोडून ट्रॅफिक सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. बराच वेळ एकाच ठिकाणी गाड्या थांबल्यामुळे आणि त्यात प्रचंड उकाड्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. तसंच वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दरम्यान, मे महिन्यामध्ये शाळा, कॉलेजला सुट्ट्या आहेत. तसंच शनिवार रविवार असल्यामुळे ऑफिसला देखील सुट्ट्या आहेत. त्यामुळे अनेक जण आपल्या कुटुंबीयांसोबत फिरण्यासाठी घराबाहेर पडतात. त्यामुळे सध्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सतत वाहतूक कोंडी होत असल्याचे समोर येत आहे. प्रत्येक आठवड्याच्या शनिवार आणि रविवारी या मार्गावरुन प्रवास करताना प्रवाशांना वाहतूक कोंडीच्या समस्येचा सामना करावा लागतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मतदारांचा घराणेशाहीला सुरुंग; एका घरातले 6 उमेदवार, सहाही पडले

शिंदेसेनेच्या मंडलिकांना मोठा धक्का; दोन्ही राष्ट्रवादीनं राखला कागलचा गड, VIDEO

ठाकरे गटाचा बालेकिल्ला ढासळला; कोकणात चालली शिंदेंची जादू, निकाल बदलणार कोकणाचं गणित?

कणकवलीत मंत्री राणेंचा पराभव; भावांच्या भांडणात संदेश पारकर नगराध्यक्ष

Nagar Palika Nagar Parishad Election: स्वबळावर लढले, जागा वाढल्या; उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंचं यश पाचपट

SCROLL FOR NEXT