कल्याणच्या चक्की नाका परिसरात वाहतूक पोलिसांचा हलगर्जीपणा पाहायला मिळाला. पोलिसांनी चहा पिण्यासाठी भर रस्त्यात पोलीस व्हॅन लावली. पोलिसांना नागरिकांनी विचारणा केली असता ‘गाडी तुमच्या घराजवळ लावू का’ असं टोकाच उत्तर पोलिसांनी नागरिकांना दिल. त्यामुळे वाहतूक कोंडीने संतप्त नागरिकांनी भररस्त्यात गोंधळ घातला. हा संपूर्ण गोंधळ नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.
कल्याण पूर्व मधील कोळशेवाडीतील चक्की नाका चौक परिसरात रविवारी सकाळच्या सुमारास वाहतूक पोलिसांनी दाखवलेली बेफिकीरी नागरिकांच्या संतापाचा विषय बनली. भर गर्दीच्या वेळेत वाहतूक पोलिसांनी मोठ्या पोलिस व्हॅनला भर रस्त्यात लावले.या ठिकाणाहून नेवाळीच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना उजवीकडे वळणं अवघड झालं आणि क्षणातच संपूर्ण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
वाहनचालकांनी जेव्हा पोलिसांना गाडी बाजूला करण्यास सांगितले, तेव्हा एका पोलीस कर्मचाऱ्याने अत्यंत उद्धटपणे उत्तर दिलं. “गाडी रस्त्यावर नाही तर तुमच्या घराजवळ लावू का?” पोलिसांचा असा मस्करीतून आणि खवचट बोलण्यातून गाडी हटवण्याऐवजी चहा पिण्यात दंग असलेला हलगर्जीपणा पाहून वाहनचालक संतप्त झाले. काहींनी रागाच्या भरात पोलिसांच्या चौकीबाहेर गोंधळ घातला.हा संपूर्ण प्रकार काही जागरूक नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट करताच वाहतूक पोलिसांवर प्रचंड टीका होऊ लागली आहे.
सामान्य नागरिक रस्त्यावर वाहन उभं केलं तर त्वरित दंड मग पोलिसांनी कायद्याचं उल्लंघन केलं तर त्यावर कारवाई का नाही? कायदाचे रक्षकच जर कायदाचं उल्लंघन करत असतील, तर मग सामान्य जनतेनं कुणाकडे पाहावं? सध्या याप्रकरणी स्थानिक रहिवासी आणि वाहनचालकामध्ये संतापाचे वातावरण असून संबंधित वाहतूक पोलिसांवर कारवाई मागणी करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.