Pune Traffic News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Traffic : अथर्वशीर्ष पठणानिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; 'या' भागातील रस्ते आज राहणार बंद

Pune Traffic News Today : ऋषीपंचमीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून बाप्पाचे अथर्वशीर्ष पठण करण्यात येणार आहे. त्यामुळे मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलाय.

Satish Daud

पुण्यात मोठ्या थाटामाटात गणरायाचे आगमन झाले असून दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. त्यामुळे शहरातील अनेक भागात सध्या वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच आज रविवारी ऋषीपंचमीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून बाप्पाचे अथर्वशीर्ष पठण करण्यात येणार आहे. त्यामुळे मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलाय.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटेपासून छत्रपती शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते रामेश्वर मंदिर चौक दरम्यानचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जाईल. त्यामुळे वाहनचालकांनी गाडगीळ पुतळा चौक मार्गे गोविंद हलवाई चौकातून उजवीकडे वळण घ्यावे.

त्यानंतर मंडईतील गोटीराम भैय्या चौकमार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी रस्त्यावरून आपल्या इच्छित स्थळी जाता येणार आहे. स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांना हाच पर्यायी रस्ता उपलब्ध करुन देण्यात आला आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

याशिवाय अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक दरम्यानचा रस्त्यावरील वाहतूक देखील बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर लक्ष्मी रस्त्यावरील विजय आणि सोन्या मारुती चौकातील वाहतूक आवश्यकतेनुसार वळवली जाणार आहे. त्यामुळे या भागातून जाणाऱ्या वाहनचालकांनी नेहरु चौकमार्गे इच्छितस्थळी जावे, असं सांगण्यात आलंय.

दरम्यान, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून आयोजित करण्यात आलेल्या या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमाला हजारो महिला भाविकांची उपस्थिती राहणार आहे. अथर्वशीर्ष पठणाची सांगता झाल्यानंतर सदरील भागातील वाहतूक पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती देखील वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunil Shelke: महाराष्ट्रातील आमदारांच्या हत्त्येचा कट?आमदाराला संपवण्याचा डाव कुणाचा?

Wardha News : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; मुलासह वडिलांचा करुण अंत, पुतण्याची मृत्यूशी झुंज

Modi Government: मोदी देणार विद्यार्थ्यांना 1 कोटी? आयडिया देणारा होणार मालामाल?

Mumbai Police : एसीबीची मोठी कारवाई; मुंबई पोलीस दलातील २ बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींसाठी भुजबळांचा एल्गार

SCROLL FOR NEXT