बकरी ईदनिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; 'या' भागातील रस्ते राहणार बंद
Pune Traffic Latest Update Today Saam TV
मुंबई/पुणे

Pune Traffic changes : बकरी ईदनिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; 'या' भागातील रस्ते राहणार बंद

Satish Daud

बकरी ईदनिमित्त पुण्यातील मुस्लिम बांधव सोमवारी (ता. १७) गोळीबार चौकातील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण करणार आहेत. त्यामुळे या भागातील रस्ते वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. गोळीबार मैदान चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. बकरी ईदचा सण साजरा करण्यासाठी दरवर्षी पुण्यातील मुस्लिम बांधव प्रचंड संख्येने एकत्र येतात. यावेळी गोळीबार चौकातील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते. हीच बाब लक्षात घेता पोलिसांकडून वाहतुकीत बदल केले जातात. आजही बकरी ईदनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. गोळीबार मैदान चौक, मम्मादेवी चौक, ढोले पाटील चौक परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

तसेच गोळीबार मैदान चौकातून शंकरशेठ रस्तामार्गे स्वारगेटकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. वाहनचालकांनी गोळीबार मैदान चौकातून वळून सीडीओ चौकातून उजवीकडे वळून गुलटेकडीमार्गे इच्छितस्थळी जाता येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

पुण्यातील हे रस्ते वाहतुकीसाठी राहणार बंद

  • सीडीओ चौकातून गोळीबार मैदानाकडे येणारा रस्ता सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत वाहतुकीस बंद असेल.

  • कोंढवामार्गे येणाऱ्या वाहनांनी खटाव बंगला चौक, मम्मादेवी चौक किंवा वानवडी बाजार, भैरोबा नाला चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.

  • गोळीबार मैदान चौकाकडे येणारी शंकरशेठ रस्त्यावरील ढोले पाटील चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

  • वाहनचालकांनी सॅलिसबरी पार्क, सीडीओ चौक, भैरोबानाला चौक या पर्यायी मार्गाचा वापर करून इच्छितस्थळी जावे.

  • सोलापूर रस्त्याने गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक मम्मादेवी चौक, बिशप स्कूलमार्गे किंवा नेपियर रस्तामार्गे, सीडीओ चौकातून वळवण्यात आली आहे.

  • कोंढवा परिसरातून येणाऱ्या सर्व वाहनांची वाहतूक एम्प्रेस गार्डन आणि लुल्लानगरकडे वळविण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fraud Case Report: तुमच्यासोबत फ्रॉड झालाय? तर Chakshu पोर्टलवरुन एका मिनिटात करा तक्रार; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Marathi Live News Updates : 'गरज असेल तरच घराबाहेर पडा', CM एकनाथ शिंदे

Munisha Khatwani Eliminated : बिग बॉसच्या घरातून मुनिषा खटवानी नॉमिनेट, बिग बॉसने अरमान मलिकला सुनावली मोठी शिक्षा

Viral Video : किंकाळ्या, आरडाओरडा आणि कामावर पोहचण्याची धडपड; ठाणे स्थानकातील जीवघेण्या गर्दीचा VIDEO व्हायरल

Mumbai Rain VIDEO: वेस्टर्न एक्सप्रेसवेवर वाहतुक कोंडी, मुसळधार पावसाचा मुंबईतील वाहतुकीला फटका

SCROLL FOR NEXT