Kalyan Shilphata saam tv
मुंबई/पुणे

Kalyan- Shil Road : आजपासून पाच दिवसांसाठी कल्याण- शिळ महामार्गावरील वाहतुकीत मोठा बदल; जाणून घ्या कारण

नागरिकांनी वाहतुक बदलाची नाेंद घ्यावी असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

Siddharth Latkar

- अभिजित देशमुख

Kalyan News : कल्याण शीळ रस्त्यावरील पलावा चौकातील उड्डाण पुलावर गर्डर बसवण्याच्या कामाला आज (बुधवार) रात्रीपासून सुरुवात हाेत आहे. या पार्श्वभूमीवर पाेलिस दलाने कल्याण-शिळ महामार्गावरील वाहतूकीत बदल केला आहे. (Maharashtra News)

कल्याण-शिळ महामार्गावर सर्वाधिक वर्दळीच्या असलेल्या पलावा चौकातील उड्डाण पुलाच्या पिलरवर गर्डर बसविण्याचे काम एमएसआरडीसीकडून (MSRDC) करण्यात येणार आहे. हे काम आजपासून (ता. 9 ऑगस्ट) साेमवारपर्यंत (ता.14) रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत करण्यात येणार आहे. (kalyan news)

त्यामुळे 14 ऑगस्टपर्यंत रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत यामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असल्याचे रवींद्र क्षीरसागर (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा ,कोलशेवाडी) यांनी नमूद केले.

कल्याण शीळ रस्त्यावर अशी राहणार वाहतूक

१) कल्याण फाटा कडून कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड - अवजड वाहनांना कल्याण फाटा येथे प्रवेश बंद. या वाहनांना कल्याण फाटा - मुंब्रा बायपास - खारेगाव टोलनाकामार्गे इच्छित स्थळी जात येईल.

२) कल्याणकडून कल्याण फाट्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना खोणी नाका - तळोजा एमआयडीसी मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Evening Yoga Tips : योगा संध्याकाळी करावा की नाही?

Maharashtra Live News Update : अजित पवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत २ राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी माझ्याकडे आग्रह केला - अंकुश काकडे

Sameer Wankhede VS Aryan Khan: समीर वानखेडेंना दिल्ली हाय कोर्टचा दणका, शाहरुखचा मुलगा आर्यनला दिलासा, काय घडलं?

हिवाळ्यात गरम पाण्यात आंघोळ केल्याने हाडे कमकुवत होतात का?

Ajit Pawar Plane Crash: ....तर असं काही घडलंच नसतं; अजित पवारांचे ड्रायव्हर श्यामराम मनवे असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT