Thane-Mulund News Saam Digital
मुंबई/पुणे

Thane-Mulund News: रेल्वेप्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! ठाणे-मुलुंड दरम्यान शनिवारी रात्री 'ट्रॅफिक ब्लॉक'

Thane-Mulund News: मध्य रेल्वेच्या मुलुंड रेल्वेस्थानकातील जुना पादचारी पूल तोडण्यासाठी शनिवारी (ता. ३) रात्री ठाणे ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Sandeep Gawade

Thane-Mulund News

मध्य रेल्वेच्या मुलुंड रेल्वेस्थानकातील जुना पादचारी पूल तोडण्यासाठी शनिवारी (ता. ३) रात्री ठाणे ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी रात्री ११.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत ५ तासांचा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

ब्लॉकदरम्यान रात्री ११ वाजून १८ मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून डाऊन जलद मार्गावरील खोपोली लोकल विद्याविहार ते दिवा स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावरून वळविण्यात येणार आहे. तसेच सीएसएमटी येथून रात्री ९ वाजून ५४ मिनिटांनी सुटणारी कल्याण आणि कल्याण स्थानकातून रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी सुटणारी सीएसएमटी लोकलही रद्द करण्यात आली आहे.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या चेन्नई सुपरफास्ट मेल, मडगाव एक्स्प्रेस, अमृतसर एक्स्प्रेस, बनारस महानगरी एक्स्प्रेस, दादरहून सुटणारी साईनगर शिर्डी एक्स्प्रेस, सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस या गाड्या शनिवारी रात्री विद्याविहार ते ठाणे-दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावरून वळविण्यात येणार असल्याने या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील; तर मुंबईत येणाऱ्या भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस, हावडा मेल, मंगळूर एक्स्प्रेस, हुसेन सागर एक्स्प्रेस आणि गदग एक्स्प्रेस कल्याण, ठाणे ते विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावरून चालवल्या जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT