Shevgaon, shevgaon bandh, radhakrishna vikhe patil, nagar news saam tv
मुंबई/पुणे

Shevgaon Bandh News : शेवगाव बेमुदत बंद; पालकमंत्र्यांच्या आवाहानंतरही व्यापारी ठाम, आजही बाजारपेठेत सन्नाटा

आजच्या एका बैठकीनंतर बंदच्या निर्णयावर अंतिम निर्णय हाेणार असल्याची माहिती व्यापारी संघटनेने दिली.

Siddharth Latkar

- सुशील थोरात

Shevgaon Bandh News : शेवगाव शहरातील घटनेनंतर आजही व्यापारी संघटना गावातील दुकानं तसेच गाव बेमुदत बंद ठेवण्यावर ठाम राहिले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील (radhakrishna vikhe patil) यांनी चुकीचे वर्तन करणा-यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन देत बंद मागे घ्यावा असे आवाहन साेमवारी (ता. 15) केले हाेते. परंतु आजही शहरातील सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. (Maharashtra News)

नगर जिल्ह्यातील शेवगाव (shevgaon) शहरात साेमवारी रात्री दोन गटात वाद निर्माण झाला हाेता. त्यानंतर दगडफेक देखील झाली. या प्रकरणी पाेलिसांनी सुमारे 250 ते 300 जणांवर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पाेलिसांनी 31 जणांना ताब्यात घेतले. या सर्वांना न्यायालयात हजर केले असताना त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान या घटनेनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेवगावात जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली. त्यानंतर व्यापा-यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांनी व्यापा-यांना बेमुदत बंद मागे घेण्याचे आवाहन केले हाेते.

आज (मंगळवार) व्यापारी संघटना बंदवर ठाम राहिले. साम टीव्हीशी बाेलताना त्यांनी आम्ही दहशतीखाली आहाेत. आमचे माेठे नूकसान झाले आहे. कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे जाणवते. चुकीचे वर्तन करणा-यांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी व्यापारी संघटनेने केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT