Sant Tukaram Sahakari Sakhar Karkhana  saam tv
मुंबई/पुणे

Maval News : मनमानी विराेधात एकवटले शेतकरी, श्री संत तुकाराम साखर कारखान्यावर उद्या काढणार माेर्चा

हा भाव मान्य करून दीपावलीपूर्वी रक्कम अदा करण्यात यावी अशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

दिलीप कांबळे

Maval News : मावळ तालुक्यातील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा (shri sant tukaram sahakari sakhar karkhana) होणारा 26 वा गळीत हंगाम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यात मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या मनमानी कारभारा विराेधात उद्या (शुक्रवार) कारखान्यावर माेर्चा काढण्याचा निर्धार शेतक-यांनी केला आहे. (Maharashtra News)

मावळ तालुक्यातील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यात मावळ, मुळशी, हवेली, खेड,आणि शिरूर या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस येत असतो. या कारखान्यात संचालक मंडळाचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा फायदा हा 38 कोटी रुपये आहे. संत तुकाराम साखर कारखान्याच्या वार्षिक सभेसाठी प्रसारित केलेल्या ताळेबंद अहवालामध्ये दिलेला 8 कोटी निव्वळ नफा व 2 कोटींची आयकर भरण्यासाठी केलेली तरतूद म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची केलेली घोर फसवणूकच आहे असा आरोप सहकार महर्षी माऊली दाभाडे (mauli dabhade) यांनी केला आहे.

वास्तविक पाहता साखर उत्पादक उद्योगाला आयकर माफ असून साखर कारखान्याला सहवीज प्रकल्पातून देखील 14 कोटी रूपये उत्पन्न प्राप्त होत आहे. एकूण 24 कोटीं रूपयांचा हिशोब ताळेबंद अहवालात मांडण्यात आला आहे. तसेच 30 रुपये क्विंटल प्रमाणे अथवा 3000 रुपये टनाने साखर विक्री होत असताना साखर कारखाना 2634 रुपये एवढाच नाममात्र भाव देत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

3700 रुपये टनाने 2 लाख टन साखर विक्री केल्याने एकूण 14 कोटी रुपये अधिकचे प्राप्त होतात असे एकूण 38 कोटी रुपये अतिरिक्त प्रमाणात साखर कारखान्याकडे जमा होतात. मागील बारा वर्षाचे 200 रुपये प्रत्येक टनाला कारखान्याकडून शेतकऱ्यांना येणे आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक टनाला साखर कारखान्याने 3300 रुपये प्रति टन भाव मिळाला पाहिजे. हा भाव मान्य करून दीपावलीपूर्वी रक्कम अदा करण्यात यावी जेणे करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होईल अशी मागणी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT