Today Maharashtra Weather Update News  Saam tv
मुंबई/पुणे

Today Weather News : राज्यात शेकोट्या विझल्या, उकाडा वाढला; किमान तापमान वाढीमुळे थंडी गायब; वाचा तुमच्या शहरात आजचे हवामान

Today Weather Update News : महाराष्ट्रात किमान व कमाल तापमानात वाढ झाल्याने उकाडा तीव्र झाला आहे. कोकणात तापमान तिशीपार गेले असून हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्णता कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात किमान व कमाल तापमानात लक्षणीय वाढ

  • कोकणात उष्णतेचा चटका, भिरा येथे ३८ अंश तापमान

  • गारवा नाहीसा, उकाडा अधिक तीव्र

राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब होऊन उकाड्यात वाढ झाली आहे. शिवाय कमाल तापमानाचा पारा सध्या तिशीपार गेला आहे. कोकणात उन्हाचा चटका वाढल्याने भिरा येथे सगळ्यात जास्त ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानातील वाढ आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

गेले काही दिवस राज्यात थंडी, पाऊस, ऊन यांचा संमिश्र खेळ पाहायला मिळाला. दरम्यान शिमगोत्सवापूर्वीच उकाडा भलताच वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. किमान तापमानात झालेल्या वाढीमुळे गारवा नाहीसा होऊन उन्हाची काहिली भलतीच तापदायक ठरत आहे. हा उकाडा पुढील काही दिवस असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणात कमाल तापमान पस्तिशीपार गेले आहे. राज्यात दिवसभर अंशतः ढगाळ हवामान असल्याने उकाडा कायम आहे. आज अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानातील चढ -उतार कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात उकाडा जाणवत असला तरीही काही राज्यात ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ऐन थंडीच्या कालावधीत सुरु झालेल्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत.

'या' भागांत मुसळधार पाऊस

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या भागात दाट धुके पडेल. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, हरिणाया या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. यासोबतच केरळ आणि तामिळनाडूकरिता पुढील २४ तासांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahanu : १६व्या शतकातील 'हा' किल्ला आजही आहे जिवंत, तुम्ही कधी पाहिलाय का?

Black Tea for High Blood Pressure: उच्च रक्तदाबाचा त्रास असलेले रूग्ण ब्लॅक टी पिऊ शकतात का?

Vinod Kambli : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी वृद्धाश्रमात, अवस्था पाहून चाहते इमोशनल; Video व्हायरल

Maharashtra News Live Update: पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला २४ तास पूर्ण

Famous Actor : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावाला लाच घेताना रंगेहात पकडलं, पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT