पुणे: आपल्या जवळच्या व्यक्तीचा खून करायचा आणि त्याने आत्महत्या केली, असल्याची चित्र घटनास्थळावर निर्माण करायचे, अशा पाच घटना शहरात (city) गेल्या ४ महिन्यात घडले आहेत. ‘क्राइम सिन’वर दिसणाऱ्या आत्महत्या या प्रत्यक्षात खून असल्याचे शवविच्छेदन अहवालामधून समोर आले आहे. कोरोना (Corona) उद्रेकाचा काळ आणि त्यानंतरच काही महिन्यांमध्ये गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. (Pune Crime News in Marathi)
हे देखील पाहा-
कोरोनाची (Corona) लाट ओसरल्यानंतर आता जवळच्या व्यक्तीचा किरकोळ कारणावरून खून करण्याचे प्रकार देखील वाढल्याचे निरीक्षण ससून रुग्णालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागातर्फे नोंदविण्यात आले. पती- पत्नी, वडील- मुलगा, सासरे- सून अशा अगदी जवळच्या नात्यांमध्ये हे खून झाले आहेत. शहरातील कात्रज, सिंहगड रस्ता अशा उपनगरांमध्ये या घटना घडल्या असल्याची माहिती विभागातर्फे सांगण्यात आली आहे.
याविषयी न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. हरीश ताटीया यांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदनाच्या अगोदर पोलिस पंचनामा केला जातो. तो पंचनामा वाचून आणि मृतदेहाची बारकाईने निरीक्षण केले जाते. शरीरावर दिसणारे व्रण, जखमा आणि पंचनाम्यात नमूद हकिगत यांच्यात तफावत असल्याचे मृतदेहाच्या प्राथमिक निरीक्षणावरून दिसून आले. डोक्यास आणि गळ्यात अंतर्गत जखमा दिसून आल्याने सदर प्रकरणात आत्महत्या नसून खून झाल्याचे निरीक्षणाला दुजोरा मिळाला. काही गुन्ह्यांमध्ये ओढणी किंवा नायलॉनच्या दोरीने व्यक्तीचा गळा आवळल्याचे दिसून आले आहे.
या पद्धतीवरून उलगडले खुनाचे गूढ
खून करून मृतदेह दोरीने फॅनला लटकविण्यात आला.
घटनास्थळावर आढळलेली दोरी आणि गळ्यावरील व्रण जुळले नाहीत
फास घेतल्यानंतर विशिष्ट पद्धतीने शरीरात बदल होतात. तसे बदल दिसले नाहीत.
व्रण, जखमा आणि पंचनाम्यात प्राथमिक खबर आणि हकिगत यांच्यात तफावत
गळफास घेतल्यानंतर विशिष्ट पद्धतीने शरीरात बदल होतात. तसे दिसले नाहीत.
इंग्रजी मधील ‘व्ही’ आकाराचे बाह्य व्रण असून पण आतील जखमांचे स्वरूप अनुरूप नव्हते.
शव परीक्षण करताना डोक्यास आणि गळ्यात अंतर्गत जखमा दिसून आल्या.
गुन्ह्याची अचूक उकल होण्यासाठी शवविच्छेदन महत्त्वाचे ठरते. या प्रकरणांमधून गुन्हेगारांनी आत्महत्या केल्याप्रमाणे घटनास्थळावरील वातावरण केले जाते. पण, शवविच्छेदनातून आलेल्या अहवालाच्या आधारावर पोलिस तपास केल्यानंतर गुन्हा उघड झाले आहेत.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.