Pune Crime News Saam Tv news
मुंबई/पुणे

कोथरूड प्रकरण तापलं; रोहित पवार आक्रमक, पोलिसांवर ताशेरे ओढले, Atrocity अंतर्गत गुन्ह्याची मागणी

Three Women Allege Police Abuse: कोथरूड पोलीस ठाण्यात तीन मुलींवर मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप. जातीवाचक शिवीगाळ व लैंगिक टिप्पण्यांमुळे संतप्त प्रतिक्रिया. अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्ह्याची मागणी.

Bhagyashree Kamble

  • कोथरूड पोलीस ठाण्यात तीन मुलींवर मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप.

  • जातीवाचक शिवीगाळ व लैंगिक टिप्पण्यांमुळे संतप्त प्रतिक्रिया.

  • रोहित पवार व अंजली आंबेडकर यांनी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्ह्याची मागणी केली.

  • पोलीस कारवाई टाळत असल्याचा आंदोलकांचा आरोप; न्यायालयीन लढाईची तयारी.

पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात ३ मुलींसोबत अमानुष प्रकार घडला. तीन तरूणींनी पोलिसांकडून छळ झाल्याचा आरोप केला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्यांना कोथरूड पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. मात्र, तिथे पोलिसांकडून मानसिक तसेच शारीरिक छळ करण्यात आला. याबाबत एका तरूणीनं फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत माहिती दिली. दरम्यान, आमदार रोहित पवार, अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर कोथरूड पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या मांडत पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

या घटनेबाबत रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. 'तीन मुलींनी पोलिसांवर जातीवाचक शिवीगाळ शारीरिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. तुम्हीxxx पोरी आहात. किती मुलांसोबत झोपलात? लेसबियन आहात का? अशा घाणेरड्या शब्दांत तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी त्यांना काही प्रश्न विचारले. या प्रकरणी मुलींसह त्यांचे काही सहकारी आक्रमक झाले आहेत. याबाबत पोलीस आयुक्तांसह उपायु्क्तांसोबतही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना दाद दिली नाही, असं ते म्हणतात. या प्रकारामुळे तरूणींना धक्का बसला आहे. यांच्या विरोधात अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पीडित मुलींपैकी दोन मुलींची मानसिक अवस्था ठीक नाहीये', अशी माहिती रोहित पवारांनी दिली.

या प्रकरणावर सुजात आंबेडकर यांनीही संताप व्यक्त केला आहे, 'तीन दिवसांपासून तरूणी पोलिसांना तक्रार दाखल करून घ्या अशी मागणी करत आहे. पण तक्रार दाखल करून कुणी घेत नाहीये. पोलीस दडपशाही करत आहेय. अॅट्रासिटीअंतर्गत गुन्हा दाखल करत नाही आहे. एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही पोलिस आयुक्तालय सोडणार नाही. पोलीस ४८ तास द्या असे म्हणत आहेत. राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे होऊ शकत नाही, असं आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, या प्रकरणात अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही. अशा आशयाचं पत्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना आणि तरूणींना पाठवलं होतं. आंदोलकांकडून दोन तासांचा वेळ घेऊन पुणे पोलिसांनी सात पानांचे पत्र आंदोलकांना दिले. यावेळी आंदोलकांनी पोलिसांकडून कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला.

संबंधित घटनाही एका खोलीमध्ये घडली आहे, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची घटना घडली नसल्यानं गुन्हा दाखल करता येणार नाही, असं पत्राक नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, संबंधित तरुणींना पत्राच्याआधारे न्यायालयात दाद मागता येईल. वंचित बहुजन आघाडीकडून तरुणींची लढाई न्यायालयात लढली जाणार, असं अंजली आंबेडकर म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejaswini Pandit: कुरळे केस अन् केशरी साडी, तेजस्विनीचं सौंदर्य पाहून व्हाल घायाळ

Eknath Shinde Shivsena : नगरमध्ये चक्क पक्ष प्रवेश घोटाळा? शिंदे गटाच्या नेत्यावर बोगस यादीचा आरोप, राजकारण तापलं

Ladki Bahin Yojana: सोलापुरातील ४३० भावांनी लाडक्या बहिणींचे पैसे लाटले, महिनाभरात इतक्या लाखांची वसूली होणार

Freshers Job Hiring : IT फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी! इन्फोसिसकडून २०,००० पदांसाठी भरती

Chest Pain : छातीत दुखण्याचे कारण हार्ट अटॅक आहे कि गॅस, कसे ओळखाल? जाणून घ्या सविस्तर माहीती

SCROLL FOR NEXT