सामूहिक बलात्कार प्रकरणी तिघांना जन्मठेप; पुणे सत्र न्यायालयाचा निकाल हायकोर्टाकडून कायम Saam Tv News
मुंबई/पुणे

सामूहिक बलात्कार प्रकरणी तिघांना जन्मठेप; पुणे सत्र न्यायालयाचा निकाल हायकोर्टाकडून कायम

हिंजेवाडी येथील एका एमबीए पदवीधर मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तिघा नराधमांना मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे.

सुरज सावंत

मुंबई: पुण्यातील हिंजेवाडी येथील एका एमबीए पदवीधर मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या तिघा नराधमांना मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला. आरोपींना दोषी ठरवत पुणे सत्र न्यायालयाने २०११ साली सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने कायम ठेवली आहे. (Three sentenced to life in gang rape case; High Court upholds Pune Sessions Court verdict)

हे देखील पहा -

एवढेच नव्हे तर या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पीडितेच्या सन्मानाचे रक्षण करण्यात अपयशी ठरले अशी टिप्पणीही खंडपीठाने केली. १ एप्रिल २०१० रोजी पुण्यातील आयटी पार्क, मानकर चौक, वाकड येथे पीडित तरुणीने घरी जाण्यासाठी गाडीत लिफ्ट मागितली त्यावेळी आरोपी सुभाष भोसले, गणेश कांबळे आणि रणजित काळे या तिघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने तिघांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या शिक्षेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात आरोपींकडून अपील करण्यात आली होती.

दरम्यान पीडित साक्षीदाराची उलट तपासणी घेताना बचाव पक्षाच्या वकिलांनी तिला अनावश्यक प्रश्न विचारले. तिने संमतीने संबंध प्रस्थापित केले तसेच तिने मद्य प्राशन केले होते हे सुचवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळेस सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आरोपींच्या वकिलांना असे प्रश्न विचारण्यापासून रोखले नाही किंवा अशा प्रकारच्या उलट तपासणीला आक्षेपही घेतला नाही. त्यामुळे सत्र न्यायालयाच्या निरीक्षणावर नाराजी व्यक्त करत तिघांना सुनावलेली जन्म ठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

Ganpati Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

SCROLL FOR NEXT