Child Health Care News  Saam Tv
मुंबई/पुणे

Thane News : कुपोषित मुलीच्या उपचारासाठी पैसे नाहीत, आई-वडील हतबल; उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील प्रकार

Rural Area Health News : कसाऱ्यातील ढेंगणमाळ येथील एका कुपोषित चिमुकलीला आर्थिक अडचणीमुळे उपचार न मिळता नसल्याने आपत्ती व्यवस्थापन टीमच्या मदतीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची नोंद प्रशासनाकडे नसल्याने यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Alisha Khedekar

कसाऱ्यातील ढेंगणमाळ येथे राहणाऱ्या एका जोडप्याने पैशा अभावी कुपोषित मुलीचे उपचार करण्यास टाळले. या जोडप्याला ६ अपत्य असून पाच मुली आणि एक मुलगा आहे. मात्र त्यातील ३ महिन्याची चिमुकली कुपोषित आहे. तिच्या उपचारासाठी पालकांकडे पैसे नसून आपत्ती व्यवस्थापनेच्या मदतीने तिला कुपोषित बालक रुग्णालयात दाखल केले गेले आहे. मात्र या कुपोषित बालिकेची नोंद शासनाकडे नसल्याने शासनाच्या यंत्रणांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कसारा जवळील ढेंगणमाळ येथे राहणाऱ्या संतोष भला व ताई भला यांना ५ मुली आणि एक मुलगा आहे. यातील एक ३ महिन्याची चिमुकली कुपोषित असून तिच्या देखभालीसाठी आणि औषधासाठी भला कुटुंबीयांकडे पैसे नाहीत. पैशांचा अभाव असल्याने चिमुकलीच्या कुटुंबीयांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. ही माहिती आपत्ती व्यवस्थापन टीमचे कसारा सदस्य शाम धुमाळ यांना मिळाली. त्यांनी त्वरित आपत्ती व्यवस्थापनाचे सदस्य नायब, तहसीलदार वसंत चौदरी व स्नेहा फाऊंडेशन च्या धनश्री साळूंखे यांनी सदर माहिती दिली. माहिती मिळताच पालकांची समजूत काढून कुपोषित बालक रुग्णालयात आणण्याची संपूर्ण जबाबदारी ही आपत्ती व्यवस्थापन टीमने स्वतःकडे घेतली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य, वैध्यकीय अधिकारी व उपकेंद्रचे डॉक्टर, रुग्णवाहिका कसारा पोलीसांना घेऊन भाला यांच्या घरी पोहचले.

चिमुकल्या मुलीच्या घरी पोहचताच तिच्या कुटुंबीयांनी गोंधळ घातला. आणि मुलीला रुग्णालयात घेऊन न जाण्याचा हट्ट धरला. अखेर आपत्ती व्यवस्थापन टीमने विनवण्या केल्या. त्यांची आर्थिक अडचण समजून घेत चिमुकलीच्या पालकांना तिला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी तयार केले. वैध्यकीय अधिकारी आणि डॉक्टरांनी कुपोषित बालीकेची प्राथमिक तपासणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार कुपोषित बालिकेला ठाण्यातील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले. ही मुलगी तीव्र कुपोषित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील या तीव्र कुपोषित बालकाची माहिती प्रशासनाकडे नसल्याचे आढळले. यावरून शासनाची कुपोषन यंत्रणा कुचकामी ठरल्याचे उघड झाले आहे. दरम्यान शहापूर तालुक्यात कुपोषणचे प्रमाण वाढत चालले असून हे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी शासनाने अनेक संस्थांना कामे दिली आहेत पण सदर संस्था ह्या कुचकामी ठरत असून ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडली असल्याचे दिसून येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT