Crime SaamTv
मुंबई/पुणे

क्लब हाऊस अ‍ॅपप्रकरणी तिघांना अटक; मुंबई सायबर पोलिसांची कारवाई

एका महिलेच्या तक्रारीवरून मुंबई सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सुरज सावंत

मुंबई - क्लब हाऊस अ‍ॅपप्रकरणी (Club House) मुंबईच्या सायबर पोलिसांनी (Police) दोघाजणांना ट्राझिस्ट रिमांडवर ताब्यात घेतले आहे. आकाश, जेष्णव आणि यश पराशर अशी या आरोपींची नावे असून त्यांना हरियानातून (Haryana) अटक करण्यात आली आहे. या तिन्ही आरोपींना आज (२१ जानेवारी) न्यायालयात हजर केलं जाणार आहे. मुंबई पोलिसांनी अशी माहिती दिली आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून मुंबई सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

बुली बाई अ‍ॅप (Bulli Bai App) नंतर क्लब हाऊस अ‍ॅप द्वारे मुस्लिम महिलांची बदनामी केली जात होती. या प्रकरणी रझा अकादमीने मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बुली बाई अ‍ॅप हे वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. या अ‍ॅपद्वारे मुस्लिम महिलांना टार्गेट करुन त्यांना अपमानित केलं जात होतं. त्यानंतर आता क्लब हाऊस अ‍ॅपप्रकरणी मुंबईच्या सायबर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: सर्वांनी मतदान करा, अजित दादांकडून आवाहन

Shani Vakri: 2025 मध्ये 'या' राशींचं पलटणार नशीब; शनीच्या वक्री चालीने तिजोरीत पडणार पैशांचा पाऊस

Assembly Election: राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान; EVM मध्ये कैद होणार ४,१३६ उमेदवारांचं भवितव्य

Virar Politics : पैसे वाटल्याच्या आरोपावरून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण; बविआ आमदार क्षितिज ठाकूरांविरोधात गुन्हा

Maharashtra Politics : विरारमध्ये राडा, डहाणूत पक्षप्रवेश; मतदानापूर्वी बविआ उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश, VIDEO

SCROLL FOR NEXT