Pimpri Chinchwad Viral Video Saam Tv
मुंबई/पुणे

CCTV Footage: बहिणीचा हात धरून चालली होती चिमुकली, इतक्यात लोखंडी गेट अंगावर कोसळला, Shocking Video

Pimpri Chinchwad Accident Viral Video: लोखंडी गेट अंगावर पडून एका साडेतीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना पिंपरी- चिंचवडमध्ये घडली आहे. याचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे.

गोपाल मोटघरे, Tanmay Tillu

Pimpri Chinchwad Accident News: पिंपरी- चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका चिमुकलीच्या अंगावर लोखंडी गेट पडल्याची घटना घडली आहे. लोखंडी गेट अंगावर पडल्याने या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बोपखेलमध्ये गणेशनगर गल्ली नंबर दोनमध्ये घडली आहे.

ही संपूर्ण भयावह घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. घटनेमुळे पुन्हा एकदा मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालकांनी मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. मुलं खेळत असताना ही दुर्घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पिंपरी- चिंचवड शहरातील बोपखेल परिसरात घडली आहे. या घटनेत गिरीजा गणेश शिंदे नावाच्या साडेतीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजता घडली असून याचा सीसीटीव्ही व्हिडिओ आज समोर आला आहे.

यापाराकरणी अद्याप कोणाच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र या घटनेत जो संबंधित घरमालक आहे, त्यांने निष्काळजीपणा केल्याचं दिसून येत आहे आणि त्याच्याविरोधात लवकरच गुन्हा दाखल होऊ शकतो.

या व्हिडिओत दिसत आहे की, गिरीजा ही येथील गणेशनगर गल्ली नंबर दोनसमोरून एका मुलीसोबत जात होती. त्यावेळी येथे एक मुलगी आपल्या घराचा गेट बंद करत असताना तो लोखंडी गेट गिरीजावर पडला आणि ती त्याखाली दबली. गेट लोखंडी अंगावर पडल्यावर जागीच तिचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

या दुर्घटनेमुळे या इमारतीबाबतच अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. इमारतीच्या मालकानं या गेटची दुरूस्ती केली नव्हती का? गेटजवळ सुरक्षा रक्षक नव्हता का? कारण थोड्यासा हलगर्जीपणा थेट तुमच्या मुलांच्या जीवावर उठू शकतो. त्यामुळे पालकांनो तुमच्या मुलांवर लक्ष ठेवा आणि त्यांची काळजी घ्या....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT