Maharashtra Political Crisis Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

बंडखोर आमदारांचा निषेध करणाऱ्या शिवसेना शाखाप्रमुखाला धमकीचा फोन

शिवसेना शाखा क्रमांक २१९ चे शाखाप्रमुख विनोद शिर्के यांनी बंडखोर आमदारांच्या विरोधात एक फेसबुक पोस्ट केली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : बंडखोर आमदाराचा निषेध करणाऱ्या शिवसेनेच्या शाखाप्रमुखाला धमकी आल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवसेनेच्या ४१ आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यभरातून शिवसैनिक आपला रोष व्यक्त करत आहेत. अशाच पद्धतीने निषेध आंदोलन करणाऱ्या शिनसेनेत्या शाखा क्रमांक २१९ चे शाखाप्रमुख विनोद शिर्के यांनी आपल्याला धमकी आल्याचं सांगितलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला (Shivsena) खिंडार पाडल्यामुळे सध्या एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट (Eknath Shinde vs Uddhav Thackeray) असे दोन गट शिवसेनेत तयार झाले आहेत. या दोन्ही गटांकडून आपापल्या नेत्यांचे समर्थन करण्यात येत आहे. यासाठी शहरात ठिकठिकाणी बॅनर देखील लावले आहेत. तसंच सर्वात जास्त सोशल मीडियावरती (Social Media) याबाबतच्या पोस्ट व्हायरल होत आहेत.

अशीच एक पोस्ट शिवसेनेच्या शाखा क्रमांक २१९ चे शाखाप्रमुख विनोद शिर्के यांनी बंडखोरांच्या विरोधात केली असता त्यांना धमकीचा फोन आला आहे. याबाबत शिर्के यांनी सांगितलं की, 'मी फेसबुवर भायखळ्यातील गद्दारांचा जाहीर निषेध! अशा आशयाची पोस्ट केली होती. यावेळी मला मुंबई महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व आमदार यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

'मी सध्या सत्तेमध्ये नाही मात्र, मी सत्तेत दोन तीन महिन्यात येईल त्यावेळी तुला बघून घेईल तसंच याचे परिणाम तुला भोगायला लागतील. अशी धमकी देत आपणाला शिवीगाळ केल्याच शिर्के यांनी सांगितलं आहे. तसंच जाधव यांनी स्वत:च्या मोबाईलवरुन फोन केला नव्हता असही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान, सेना फुटीचे पडसाद राज्यभरात पहायला मिळत आहेत. धुळ्यात (Dhule) देखील गटांमधील वाद समोर आला आहे. धुळ्यात मंत्री एकनाथ शिंदे समर्थकांनी लावलेला बॅनर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थकांनी फाडले असून या बॅनरबाजीमुळे दोन गटामधीव वातावरण तापलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात 2 पूरबळी; यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपलं

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT