Sudhir Mungantiwar saam tv
मुंबई/पुणे

Republic Day : सुधीर मुनगंटीवार यांचा एक फोन अन्...; यंदा प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार

केंद्र सरकारने महाराष्ट्राला मोठा दिलासा दिला आहे. यंदाच्या प्रजासत्ताकदिनी परेडसाठी महाराष्ट्राचा चित्ररथ असणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

Republic Day parade News : केंद्र सरकारने महाराष्ट्राला मोठा दिलासा दिला आहे. यंदाच्या प्रजासत्ताकदिनी परेडसाठी महाराष्ट्राचा चित्ररथ असणार आहे. महाराष्ट्राची विनंती केंद्र सरकारने विनंती मान्य केली आहे. महाराष्टाचा समावेश व्हावा यासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. (Latest Marathi News)

महाराष्ट्राने यंदाच्या प्रजासत्ताकदिनी साडेतीन शक्तीपीठांच्या देखाव्यासह आठ वेगवेगळे प्रस्ताव दिले होते. त्यामुळे आपला चित्ररथ नाकारला गेला होता. दोन दिवसांपूर्वी सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केंद्रीय सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना फोन करून विनंती केली. त्यानंतर आज, शुक्रवारी केंद्र सरकारकडून निरोप आला आहे की, राज्याचा चित्ररथ स्वीकारला आहे. यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षी महाराष्ट्राकडून जैवविविधता आणि मानके या विषयावर चित्ररथ साकारण्यात आला होता. या चित्ररथाला लोकपसंतीमध्ये पहिला क्रमांक मिळाला होता. १९७१ ते २०२२ या काळात महाराष्ट्राने ५१ वर्षाच्या काळात ३८ वेळा चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या परंपरेचे दर्शन घडवले आहे. यासाठी महाराष्ट्राला १२ वेळा उत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कारही मिळाला आहे.

चित्ररथाची निवड कशी होते?

परेडसाठी मागच्या वेळी चित्ररथाचा समावेश नसल्याने तामिळनाडू आणि पश्चिम बंगालने आक्रमक भूमिका घेतली होती. राज्यांची संख्या अधिक पण चित्ररथ दरवेळी ठराविक संख्येतच निवडावे लागतात, त्यामुळे रोटेशन पद्धतीनुसार ही निवड होत असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT