सरकारी भरतींच्या परिक्षांमध्ये सावळा गोंधळ घालण्याची सवयच या सरकारला जडली आहे - पडळकर
सरकारी भरतींच्या परिक्षांमध्ये सावळा गोंधळ घालण्याची सवयच या सरकारला जडली आहे - पडळकर Saam Tv News
मुंबई/पुणे

सरकारी भरतींच्या परिक्षांमध्ये सावळा गोंधळ घालण्याची सवयच या सरकारला जडली आहे - पडळकर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: सरकारी भरतींच्या परिक्षांमध्ये सावळा गोंधळ घालण्याची सवयच या सरकारला जडली आहे, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. पडळकर म्हणाले की, "काही दिवसांपूर्वीच आरोग्य विभागाने कोणतीही पुर्वसुचना न देता आपली परिक्षा रद्द केली होती. कोरोनाच्या संकटात, विद्यार्थी कसे तरी परीक्षा केंद्रावर पोहोचले होते, त्यांना माघारी पाठवलं होतं. सरकारी भरतींच्या परिक्षांमध्ये सावळा गोंधळ घालण्याची सवयच या सरकारला जडली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षाही यांनी सहा वेळा पुढं ढकलली होती. विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत. याचं गांभीर्य सरकारला नाही." अशी टीका त्यांनी सरकारवर केली आहे. (This government is in the habit of making a mess in government recruitment exams said Gopichand Padalkar)

हे देखील पहा -

पुढे ते म्हणाले की, ''प्रशासनात आणि सरकारमध्ये कसलाच ताळमेळ नाही. इतकं होऊन पुन्हा नव्या होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या तारखेत गोंधळ घातलाय. एकाच दिवशी दोन परीक्षा दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात ठेवल्यात. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांचा परिक्षांना समोर जाण्याचा अधिकारच नाकारताय, त्यांची संधी नाकारताय. एकतर हे वसुली सरकार नोकर भरती काढत नाही, काढली तर असा गोंधळ घालतं. सरकारच्या या गलथान कारभारामुळे स्वप्नील लोणकर सारख्या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला, पण या प्रस्थापितांचं सरकार निर्लज्जासारखं वावरतंय.'' अशी बोचरी टीका पडळकरांनी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RR vs KKR, IPL 2024: शेवटच्या सामन्यात कोण उधळणार विजयाचा गुलाल? असा राहिलाय राजस्थान - केकेआरचा रेकॉर्ड

Today's Marathi News Live: २ जणांचा जीव घेणाऱ्या "त्या" अल्पवयीन तरुणाला तात्काळ जामीन

Second Hand Bikes: सेकंड हँड बाईक खरेदी करण्यापूर्वी कोणती घ्यावी खबरदारी?

Online Fraud : पिझ्झा फ्रेंचायसी देण्याचे कारण सांगत साडेअकरा लाखांत फसवणूक

Benifits of Vegetables: फळं आणि भाज्या खाल्यामुळे होणारे फायदे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT