Death After Falling From Local Train Yandex
मुंबई/पुणे

Commuters Falls From Train : लोकलगर्दीचे बळी! ५ दिवसांत ३ प्रवाशांचा ट्रेनमधून पडून मृत्यू

dombivli Commuters Falls From Train : मध्य रेल्वेच्या डोंबिवली-मुंब्रा दरम्यान प्रवाशांचा लोकलमधून पडून तिसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : मध्य रेल्वेच्या डोंबिवली-मुंब्रा दरम्यान लोकलमधून पडून तिसऱ्या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मागील पाच दिवसांत आतापर्यंत तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याने लोकांमध्ये चिंता वाढली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग कधी येणार, असा सवाल रेल्व प्रवाशांकडून केला जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी डोंबिवली-मुंब्रा दरम्यान ४९ वर्षीय राहुल पुरुषोत्तम अष्टेकर नावाच्या व्यक्तीचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. मुंब्रा स्टेशनजवळ धावत्या लोकल ट्रेनमधून पडून त्यांचा मृत्यू झाला. मागील पाच दिवसांत तिसऱ्या प्रवाशाचा मृत्यू झाल्याने लोकल गर्दीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

गेल्या आठवड्याभरात डोंबिवली ते मुंब्रा लोकल प्रवासादरम्यान लोकलमधील गर्दीमुळे तीन प्रवासी लोकलमधून पडून त्यांचा मृत्यू झाले आहेत. डोंबिवली रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वे मार्गावरील प्रचंड गर्दीचे रेल्वे स्थानक आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकावरून दिवसभरात दोन सव्वा दोन लाख प्रवासी लोकलने ये-जा करतात.

प्रवाशांमुळे कोट्यवधी रुपयाचे उत्पन्न डोंबिवली रेल्वे स्थानकाकडून रेल्वेला मिळत असल्याची माहित मिळत आहे. मात्र या मोबदल्यात या रेल्वे स्थानकावर,लोकलमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे कडून केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचा प्रकार दिसून येत आहे, असा रोष प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे.

'रेल्वे प्रवाशांकडून डोंबिवलीहून सुटणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये वाढ करण्याची मागणी आहे. लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र या मागणीकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे, असा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. या मार्गावर रेल्वे आणखी किती प्रवाशांचा बळी घेणार, असा सवाल आता नागरिकांनी उपस्थित करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

T2O वर्ल्डकप आधीच टीम इंडियाला मोठा झटका; प्रमुख खेळाडू संघाबाहेर, कारण काय?

SCROLL FOR NEXT