ajit pawar new cctv video  Saam tv
मुंबई/पुणे

अजित पवारांच्या अपघाताचा नवा व्हिडिओ; अवघ्या १० सेकंदात सगळं संपलं, VIDEO

ajit pawar new cctv video : अजित पवारांच्या अपघाताचा नवा व्हिडिओ हाती आली आहे. या व्हिडिओमध्ये १० सेकंदात सगळं संपल्याचं दिसत आहे.

Vishal Gangurde

अजित पवारांचा २८ जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू

विमान अपघाताचा तिसरा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

व्हिडिओमध्ये काही सेकंदात विमान कोसळून स्फोट

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवरून आता नवनवीन प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. अजित पवारांचा घातपात झाल्याची शक्यता रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत व्यक्त केली. ऐनवेळी विमानाचा पायलट का बदलला, असाही प्रश्न रोहित पवारांनी विचारला. अजित पवारांच्या मृत्यूवर अनेकांच्या मनात शंकेच काहूर सुरू असताना त्यांच्या अपघाताचा नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

अजित पवारांचा २८ जानेवारी रोजी विमान अपघात मृत्यू झाला. अपघाताच्या दिवशी दोन सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आले होते. बारामती विमानतळाजवळील पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीत अपघाताचा थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर बारामतीमधील गोजुबावी गावातील एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला होता. या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये विमान तिरपं होऊन थेट जमिनीवर कोसळलं होतं. विमान जमिनीवर कोसळताच जमिनीवर मोठा स्फोट झाला होता.

दोन सीसीटीव्ही व्हिडिओनंतर आता अपघाताचा तिसरा सीसीटीव्ही व्हिडिओ हाती आला आहे. या व्हिडिओमध्ये अवघ्या काही सेकंदात अजितदादांच्या विमानाचा अपघात होतो. अपघात झाल्यानंतर क्षणार्धात स्फोट झाला. अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला, त्या ठिकाणाचा अपघातावेळीचा हा नवा व्हिडिओ आहे. धावपट्टीसमोर उतरताना स्फोट झाल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

धावपट्टीची नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून पाहणी

बारामती विमानतळाची नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) च्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती, तांत्रिक सुविधा तसेच आपत्कालीन यंत्रणा यांची सविस्तर तपासणी करण्यात आली. विमानतळ सुरक्षित आहे का, याबाबतचा अंतिम निर्णय पाहणीनंतर तयार होणाऱ्या अहवालावर अवलंबून राहणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून लवकरच सविस्तर अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या पाहणीमुळे विमानतळाच्या सुरक्षा मानकांबाबत स्पष्टता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

Fact Check : इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांचा हल्ल्यात मृत्यू? व्हायरल व्हिडिओमागील सत्य आले समोर

Bigg Boss Marathi 6 : आठव्या आठवड्यात ७ सदस्य नॉमिनेट, बिग बॉसच्या घरातून कोणाचा होणार पत्ता कट?

Maharashtra Live News Update: नाशिकच्या तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

US Iran conflict : अमेरिकेविरोधात इस्लामिक राष्ट्रे एकवटली, इफ्तार पार्टीत ट्रम्प यांना इशारा

SCROLL FOR NEXT