पोपट समोर आल्यावर गोष्टी समोर येतील; भाजपला तोंड दाखवणे कठीण जाईल - नवाब मलिक Saam Tv
मुंबई/पुणे

पोपट समोर आल्यावर गोष्टी समोर येतील; भाजपला तोंड दाखवणे कठीण जाईल - नवाब मलिक

विधानसभेत गोष्टी समोर आल्या की ह्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. ह्याचा शेवट बोगस माणसाची नोकरी जाणे, त्याला तुरुंगात टाकणे याने या पिक्चरचा शेवट होईल, असं मलिक म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक, मुंबई

मुंबई: कार्डिलीया क्रुज प्रकरणी (cordelia cruise) आर्यन खानला (aryan khan) अटक करणारे एनसीबीचे (ncb) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik ncp) हे सतत वानखेडेंवर गंभीर आरोप करत आहेत. कालच नवाब मलिकांनी "पिक्चर अभी बाकी आहे" असं ट्विट केलं होतं. त्यानुसार त्यांनी आज पत्रकार परिषद घेत वानखेडे आणि भाजपवर थेट आरोप केले हा आहेत. (Things will come to the fore when the parrot comes to the fore; BJP will be difficult to face - Nawab Malik)

हे देखील पहा -

नवाब मलिक म्हणाले की, कालपासून परिस्थिती बदलली आहे, जो व्यक्ती आर्यन खानला घेऊन जात होता आज तो व्यक्ती तुरुंगात आहे. जो व्यक्ती आर्यन खानला बेल मिळू नये म्हणून प्रयत्न करत होता, तो कोर्टात होता मुंबई पोलीस (mumbai police) तपास करत आहेत. आता सिक्वेन्स बदलला आहे, पकडणारे आता बचाव व्हावा म्हणून प्रयत्न करत आहे. पिक्चर अभी बाकी है असं म्हणत जामीन मिळणे हा अधिकार आहे असं मलिक म्हणाले. स्पेशल कोर्टने दोन दिवस आधीच दोन लोकांना जामीन दिला, काल तीन लोकांना जामीन दिला.

ही लढाई कोणाच्या कुटुंब किंवा धर्माबाबत नाही

वानखडे म्हणाले माझ्या कुटुंबाला ह्यात आणले, मी कधी त्यांच्या आईबाबत बोललो नाही, मी जन्म दाखला दिला, त्यात त्यांच्या वडिलांचे नाव सांगितले. त्यांच्या आताच्या बायकोचे नाव घेतले नाही, बोललो नाही, ही लढाई कोणाच्या कुटुंब किंवा धर्माबाबत नाही असं नवाब मलिकांनी स्पष्ट केलं आहे. पुढे त्यांनी आरोप केला की, आजही मुंबईतील तुरुंगात लोक बंद आहेत. अनेकांना चुकीच्या पद्धतीने पकडलं आहे. स्पेशल २६ पत्र आम्ही एनसीबीला दिले, ते तपास करत नाही हा गंभीर विषय आहे, २६ प्रकरणात तपास करावा. आम्ही मागणी करतो २२ व्या प्रकरणात एक नायजेरियन नागरिकाला चुकीच्या पद्धतीने फसवलं, त्यातील पंचाने सांगितलं कसं फसवलं, आज मी एक पत्र पुन्हा लिहिले आहे. नायजेरियन प्रकरणाचा हवाला देत २६ प्रकरणांचा तपास करा. गुन्हेगार पकडणं जे गुन्हेगार नाही त्यांना न्याय मिळायला हवा, निर्दोष लोकांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

समीर वानखडेंचे काशिफ खानशी चांगले संबंध

दाढीवला आहे काशिफ खान आहे. तो फॅशन टीव्ही इंडिया हेड असून देशभरात फॅशन शो करतो, त्यात ड्रग्स विकतात, सेक्स रॅकेट चालवण्याचे काम करतो. त्या दिवशी जे आयोजक होते, त्यात एक काशिफ खान होता, तो व्यक्ती रविवारी आपल्या प्रियसीबरोबर नाचताना दिसतो. हा फॅशनच्या नावावर पोनोग्राफी, ड्रॅग्सचा धंदा करतो, सेक्स रॅकेट चालवतो, समीर वानखडेंचे काशिफ खानशी चांगले संबंध आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

मग नवाब मलिक मराठी नाही का?

काल पासून बघतोय, मला कोर्टात नेण्याची भाषा वानखडे बोलत आहे. परवा कोर्टात एक याचिका दाखल केली. ज्यात नवाब मलिक यांना मीडियात बोलण्यास थांबावावे, ट्विटरवर लिहायला थांबवावे मात्र न्यायलायने आदेश दिला की याबाबात रेग्युलर हिअरिंग होईल अशी माहिती त्यांनी दिली. तुम्ही कुणाचा बोलण्याता अधिकार हिरावू शकत नाही असंही ते म्हणाले. वानखेडे कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्राबाबत मलिक म्हणाले की, माझं कुटूंब पण ७० वर्षांपासून या शहरात राहतयं. मग नवाब मलिक मराठी नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र सरकारला, मुंबईला, बॉलिवूडला बदनाम करण्याचा भाजपचा कट

नवाब मलिकांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, भाजप कट रचत आहे. महाराष्ट्र सरकारला, मुंबईला, बॉलिवूडला बदनाम करत आहे. यूपी सरकार फिल्मसिटी तयार करत आहे, त्यामुळे त्यांना वाटतं की बॉलिवूड मुंबई बाहेर जाईल. बॉलिवूड बनवण्यात दादासाहेब फाळके, व्ही शांताराम अशा अनेक मराठी लोकांनी मेहनत केली आहे. बॉलिवूड मध्ये रोजगार मिळतो. योगी महाराजांना वाटतं की बॉलिवूड यूपीला जाईल. पण बॉलिवूड ने भारताला ओळख दिली आहे. मुंबई हे मिनी भारत आहे.

क्रांती रेडकर (kranti redkar) यांना उद्देशून मलिक म्हणाले की, रेडकर ताई, महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या लोकांना तुम्ही शरण आहेत. तुमचा नवरा अशा लोकांबरोबर आहे जे महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. मराठी अस्मितेच्या नावाखाली जी अपेक्षा आहे ते होणार नाही. न्यायासमोर जात, धर्म,भाषा चालत नाही.

भाजप नेत्यांचे जवळचे लोक एनसीबी कार्यालयात जातात

एनसीबीवर गंभीर आरोप करत मलिक म्हणाले की, भाजपचे जवळचे लोक एनसीबी कार्यालयात जातात, भेटतात. काही भाजप नेत्यांचे राईड हॅन्ड समीर वानखडेंना भेटत आहे, कालपासून ह्या हालचाली वाढल्या आहेत. काशिफ खानला अटक झाल्यावर अनेक लोकांच्या चेहऱ्यावरचा पडदा उघड पडेल. त्याच्याकडे कोणाचे पैसे आहेत, त्याची चौकशी झाली तर कळेल. हिवाळा विधानसभेत माझ्यावर आरोप होईल, त्याचे उत्तर देताना सर्व समोर आणीन, अनेक लोकांचे ड्रग्स कनेक्शन आहेत. नेत्यांच्याबाबत आज नाव घेत नाही. हिवाळी अधिवेशनात भाजप हल्ले करणार, माझ्या जावयाचे नाव बदनाम करणार, आता पोपट समोर आल्यावर गोष्टी समोर येतील आणि या नेत्यांना तोंड दाखवणे कठीण जाईल असा दावा त्यांनी केला.

गोसावीच यांची पोलखोल करेल

पुढे मलिक म्हणाले की, फ्लेचर पटेल फ्रॉड आहे, मोटर सायकलवर आर्मी लिहिलं आहे. फ्लेचर पटेलबरोबर आदिल उस्मानी नावाचा माणूस आहे. जो पंच आहे, तो इंपोर्ट - एक्सपोर्टचे काम करतो. जेव्हा गोसावीमुळे (kiran gosavi) हे उघडकीस आले, तो इथून पळून गेला. दिल्लीला त्याला आता अटक झाली. आता त्याच्यावर खंडणीते गुन्हे आहेत. गोसावीच यांची पोलखोल करेल आता इंटरव्हल झाला आहे असं नवाब मलिक म्हणाले.

गोसावी आणि भाजप नेते पार्टनर

किरण गोसाबाबत मलिकांनी गौप्यस्फोच केला आहे, ते म्हणाले की, गोसावी आणि भाजप नेते पार्टनशीपमध्ये आहेत. त्यांची बायको एका कंपनीत पार्टनर आहे. गोसावी, भाजप नेते, त्याची पत्नी एक कंपनीत संचालक आहे. हे सर्व विधानसभा पटलावर ठेवणार. विधानसभेत गोष्टी समोर आल्या की ह्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. ह्याचा शेवट बोगस माणसाची नोकरी जाणे, त्याला तुरुंगात टाकणे याने या पिक्चरचा शेवट होईल, असं मलिक म्हणाले.

होय मी भंगारवाला आहे

विरोधकांना धारेवर धरताना मलिक म्हणाले की, ते सांगतात मी भंगरवाला आहे. वयाच्या सोळाव्या वर्षांपासून मी भंगार धंदा केला आहे. माझं गोडाऊन आहे. माझ्या आजोबाने कुठल्याही डाकूकडून सोनं घेतलं नाही. मी मुंबईत गोल्ड स्मगलिंग केलं नाही. मी खोटं बोलून बँकेचे पैसे खाल्ले नाही. मी बँकेकडून कंपनी निर्माण करून पैसे लुटले नाही. माझ्यावर आरोप नाही. मी भंगरवाला आहे, त्याची किमयागिरी यांना माहीत नाही. जी वस्तू उपयोगी नसते, त्याचे तुकडे करून भट्टीत टाकून त्याचे पाणी करतो. नवब मलिक या शहरातील भंगार काढून त्यांचे नट बोल्ट काढून त्यांचे पाणी बनवणार असा इशारा मलिकांनी विरोधकांना दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT