Robbery in Nanded Saam TV
मुंबई/पुणे

दुधवाला समजून आजीने दरवाजा उघडला, पण...; अंबरनाथमध्ये घडला धक्कादायक प्रकार

अंबरनाथ येथे एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे.

अजय दुधाणे

अंबरनाथ : येथे एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. एका चोरट्याने वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिच्या मानेला चाकू लावून (Gold Robbery) सोनसाखळी चोरली आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या फातिमा शाळेजवळ कॅनरा बँकेला लागून दिलीप निवास नावाची इमारत आहे. या इमारतीत पहिल्या मजल्यावर सौशम्मा वर्गीस त्यांच्या पतीसोबत राहतात. मंगळवारी सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान त्यांच्या घराबाहेर कुणीतरी उभं असल्याचं सौशम्मा यांना दिसलं. त्यानंतर त्यांनी दार उघडून पाहिल्यावर तोंडाला मास्क लावून दाराजवळ उभा असलेला चोर पाहिला. त्यानंतर चोरट्याने चाकूचा धाक दाखवून सोनसाखळी चोरली. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Ambarnath robbery crime latest news update)

काय घडलं नेमकं?

अंबरनाथ पश्चिमेच्या फातिमा शाळेजवळ कॅनरा बँकेला लागून दिलीप निवास नावाची इमारत आहे. या इमारतीत पहिल्या मजल्यावर सौशम्मा वर्गीस आणि त्यांचे पती हे वृद्ध दाम्पत्य वास्तव्याला आहे.मंगळवारी सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान त्यांच्या घराबाहेर कुणीतरी उभं असल्याचं सौशम्मा यांना दिसलं.

त्यामुळे दूधवाला आला असेल असं समजून त्यांनी दार उघडून पाहिलं. त्यानंतर तोंडाला स्कार्फ बांधलेला एक अनोळखी तरुण तिथे उभा असल्याचं त्यांना दिसला. हा तरुण सौशम्मा यांच्या घरात घुसला आणि त्यांना सोफ्यावर बसवत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी काढू लागली.

चोरट्याला सौशम्मा यांनी विरोध करताच या चोरट्याने चाकू काढून त्यांच्या गळ्याला लावला आणि जबरदस्तीने त्यांची सोनसाखळी हिसकावत पळून गेला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून जबरी चोरीचा गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिलीय.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याची हत्या, लोहगडावर फिरायला नेऊन केतन अग्रवालचा घात

Maharashtra Politics: ऑपरेशन टायगरनंतर 'ऑपरेशन बीएमसी' खासदारांनंतर आता नगरसेवकही फुटणार?

Maharashtra News Live Update: पुण्यात गुजरातमधून विक्रीसाठी आणलेला गुटखा जप्त

तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! नागपूरात बनावट डॉक्टरचा पर्दाफाश, पुण्यात नकली स्किनकेअरचा धक्कादायक प्रकार

शिंदेसेनेच्या नेत्याकडून बाळासाहेबांची खिल्ली, पावसकरांच्या लेखी शिवसेना पाळणाघर

SCROLL FOR NEXT