अडसुळांना दिलासा नाहीच; ED विरोधात याचिकेवर उद्या पुन्हा सुनावनी Saam Tv
मुंबई/पुणे

अडसुळांना दिलासा नाहीच; ED विरोधात याचिकेवर उद्या पुन्हा सुनावनी

ED विरोधातील याचिकेवर आज सुनावणी दरम्यान अडसुळांना काही दिलासा मिळालेला नाहीच.

सुरज सावंत

सुरज सावंत

मुंबई : सिटी कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा City co operative bank scam प्रकरणात ईडीच्या ED च्या रडारवर आनंदराव अडसूळ आहेत. त्यांनी EDच्या विरोधात हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. ED कडून दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करत होणाऱ्या अटकेपासून दिलासा मिळण्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी दरम्यान अडसुळांना काही दिलासा मिळालेला नाहीच. कोर्टाकडून ED विरोधात केलेल्या याचिकेबद्दल सुनावणीसाठी त्यांना उद्याची तारीख देण्यात आली आहे.

हे देखील पहा-

आज कोर्टात सुनावणीदरम्यान, अडसुळ यांच्या वकिलांनी मागणी केली की, याचिकाकर्ता वयस्कर आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना सुद्धा ईडीचे अधिकारी रुग्णालयाबाहेर ताबा घेण्यासाठी येत आहेत. त्यांच्यावर सुरू असलेले उपचार लक्षात घेता त्यांना अटक करू नये अशी मागणी अडसुळाच्या वकिलांनी केली.

मात्र, याविरोधात ईडीच्या वकीलांनी आरोप केला की, हे प्रकरण गंभीर आहे. त्यांनी त्यांच्या राजकीय ओळखीचा उपयोग करून ते अ‍ॅडमिट झाले आहेत.

परंतु, ईडीचे अधिकारी सम्मन घेऊन जाताच, आरोपी आजारी पडला आणि त्याने स्वतःला रुग्णालयात एडमिट करून घेतलं आहे. असा आरोप ईडीच्या वकिलांनी केला आहे.

तसेच त्यानंतर, संशयित न्यायालयाची पायरी चढतात, याचिका दाखल करतात आणि दिलासा मागण्याचा प्रयत्न केला जातो. मग संशयिताची चौकशी कशी करायची, ईडीचे अधिकारी काम कसं करणार असा प्रश्न ईडीच्या अधिकार्यांनी उपस्थित केला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: टिटवाळातील काळूनदीत २ बहिणींचा बुडून मृत्यू

Smartphone Hanging: तुमचा फोन वारंवार हॅंग होतो का? मग 'या' टिप्स करा फॉलो

Balen Shah: Gen-Z क्रांती! कर्नाटकात शिक्षण, नंतर महापौर, प्रसिद्ध रॅपर नेपाळचा कारभार हाकणार?

Maharashtra Politics: मोठी उलथापालथ; ठाण्यात शिंदेंची राजकीय खेळी; भाजपच्या आठ शिलेदारांचा शिवसेनेत प्रवेश

RBI Vacancy 2025 : RBIमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १० ऑगस्टपासून ऑफिसर पदासाठी भरती

SCROLL FOR NEXT