काँग्रेसच्या मंत्र्यांना ‘कर नाही तर डर कशाला’ - नाना पटोले SaamTV
मुंबई/पुणे

काँग्रेसच्या मंत्र्यांना ‘कर नाही तर डर कशाला’ - नाना पटोले

हसन मुश्रीफांवर केलेल्या आरोपाबाबत या आधीच चौकशी झाली आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - महागाई, (Inflation) केंद्रातील भ्रष्टाचार, शेतीचे प्रश्न (Agricultural Problems) तसेत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अशावेळी भाजप (BJP) जाणीवपूर्वक लोकांची मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यासाठीच महाविकास आघाडी सरकार (MVA Goverment) मधील नेत्यांवरती भाजप असे आरोप करत आहे. मात्र काँग्रेसच्या मंत्र्यांना घाबरण्याचे काही एक कारण नाही कारण ‘कर नाही तर डर कशाला’ असं वक्तव्य कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. (There is no reason for Congress ministers to be scared- Nana Patole)

हे देखील पहा-

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे तसेच कुणावर कसे आरोप करायचे, कधी करायचे ब्लॅकमेल (Blackmail) करण्यासाठीचे प्लॅनच राज्यातील भाजपा नेत्यांना दिले आहेत असा आरोपही पटोले यांनी भाजपवरती केले आहेत. किरिट सोमय्या (Kirit somaiya) यांना जर जाण्यापासून रोखलं नसतं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता त्यामुळे जिल्हाधिका-यांनी सोमय्यांना पत्र पाठवलं होतं तसंच कायदा सुव्यवस्था सांभाळणं सरकारचे काम आहे आणि त्यांना अटकही केलेली नाही असं त्यांनी यावळी सांगितल ते पत्रकारांशी बोलत होते.

काल पासून राज्यात सुरु असलेल्या हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि किरीट सोमय्यांच्या प्रकरणावरती ते बोलत असताना वरिल वक्तव्य कले आहे तसेच किरीट सोमय्यांच्या आरोपांची भिती आम्हाला कशाला ‘काँग्रेसच्या मंत्र्यांनी काहीही केलेले नाही, कर नाही तर डर कशाला’ अशा पद्धतीचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

तसेच सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकार वरती आरोप करण्यापेक्षा आणि भ्रष्टाचारमुक्त राज्याकरता भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचारावरतीही सोमय्यानीं बोलण्याचा सल्ला देखील यावेळी नाना पटोलेंनी किरिट सोमय्यांना दिला. शिवाय हसन मुश्रीफांवर केलेल्या आरोपाबाबत या आधीच चौकशी झाली आहे असही त्यांनी यावेळी सांगितलं.

Edited By - jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT