तुळजाभवानीच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या ‘त्या’ मंदिर व्यवस्थापकाला अखेर अटक!
तुळजाभवानीच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या ‘त्या’ मंदिर व्यवस्थापकाला अखेर अटक!SaamTV

तुळजाभवानीच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या ‘त्या’ मंदिर व्यवस्थापकाला अखेर अटक!

नाईकवाडी यांनी भवानी मातेच्या मंदिरामधील 35 तोळे सोने, 71 किलो चांदी आणि 71 प्राचीन नाणी हडपली आहेत.
Published on

कैलास चौधरी -

तुळजापूर - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी (Tulja Bhavani) देवीच्या प्राचीन दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी (Manager Dilip Naikwadi) यांना तब्बल एक वर्षांनी तुळजापूर पोलिसांनी (Tuljapur police) अटक केली आहे. 13 सप्टेंबर 2020 रोजी नाईकवाडीं वरती गुन्हा नोंद करण्यात आला होता. नाईकवाडी यांनी भवानी मातेच्या मंदिरामधील 35 तोळे सोने, 71 किलो चांदी आणि 71 प्राचीन नाणी हडपली आहेत.(Tulja Bhavani's temple manager arrested)

हे देखील पहा-

नायकवडी तब्बल 17 वर्ष मंदिर संस्थानाच्या व्यवस्थापक पदावरती होते. या कालावधीत त्यानी टप्या-टप्याने पुरातन नाणी गायब केली होती. पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी ॲड.शिरीष कुलकर्णी यांच्या मार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे तक्रार केली होती त्यानंतर चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात आली यात काही धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या.

तुळजाभवानीच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या ‘त्या’ मंदिर व्यवस्थापकाला अखेर अटक!
...म्हणून शाळा उघडण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयचा नकार!

तुळजाभवानी मंदिर संस्थानचा धार्मिक व्यवस्थापकपदी असताना दिलीप नाईकवाडी याने 29 नोव्हेंबर 2001 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत पदाचा दुरुपयोग करत तुळजाभवानी मंदिर संस्थान व भाविकांची फसवणूक केली असून त्याचा ताब्यात असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचा खजिना व जामदार खान्यातील अतिप्राचिन अलंकार, वस्तू सोन-चांदीचे दागिने प्राचीन नाणे (Ancient coin) याचा अपहार केल्याचे आढळून आले त्यामुळे समितीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तात्कालिन धार्मिक व्यवस्थापक दिलीप देविदास नाईकवाडी विरोधात पोलीस ठाण्यात 323 कलम 420, 464, 409, 467, 468, 471, 381 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल एक वर्षांनी आज नायकवडीला अटक करण्यात आली आहे. तसेच नायकवडी यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com