Theif stole fans in Ulhasnagar as it was hot
Theif stole fans in Ulhasnagar as it was hot अजय दुधाणे
मुंबई/पुणे

Ulhasnagar : गर्मी वाढली! उल्हासनगरात चक्क पंख्यांची चोरी; चोरट्याला अटक

अजय दुधाणे

उल्हासनगर: राज्यात अनेक भागात उष्णतेची लाट आली आहे. त्यात मुंबई आणि उपनगर भागाच तर पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत गेलाय. अशाच गरम होणं साहजिक आहे. एकीकडे तापमानाचा (Temperature) पारा वाढू लागलेला असतानाच चोरट्यांनी (Thief) आता चक्क पंखे (Fans) चोरायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. उल्हासनगरात (Ulhasnagar) अशाच पद्धतीने पंखे चोरताना एक चोरटा सीसीटीव्हीत (CCTV) कैद झालाय. या चोरट्याला उल्हासनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यायत. यावरुन वाढत्या गर्मीमुळे चोरही हैराण झाले असल्याचं चित्र आहे. (Theif stole fans in Ulhasnagar as it was heat wave)

उल्हासनगरच्या कॅम्प १ मधील मधुबन चौकात रवी तेजवानी यांचं हिरा ट्रेंड एजन्सीज नावाचं इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं दुकान आहे. या दुकानात ३० एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास एक चोरटा घुसला. या चोरट्याने दुकानाच्या काउंटरच्या बाजूला ठेवलेले फिनोलेक्स कंपनीचे चार सिलिंग फॅन असलेला एक बॉक्स उचलून नेला. सोमवारी स्टॉक तपासत असताना पंखे कमी असल्यानं सीसीटीव्ही तपासलं असता त्यात सगळा प्रकार समोर आला. याप्रकरणी दुकानमालकानं उल्हासनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आयपीसी ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला. यानंतर काही तासातच या चोरट्याला बेड्या ठोकण्यात आल्या.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: १० वर्षापूर्वी चहावर चर्चा केली, आता कामावर चर्चा करा; उद्धव ठाकरेंनी PM मोदी- शहांना केलं लक्ष्य

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे गेल्या १० वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? ; कोकणातून राज ठाकरेंची तोफ धडाधडली

साडीत खुललं Sonalee Kulkarni चं मनमोहक सौंदर्य; पाहा अप्सरेचे Photos

Amit Shah: रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने पराभूत होतील, अमित शाह यांचं भाकीत

Jammu Kashmir: काश्मीरमध्ये हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला

SCROLL FOR NEXT