मलंगडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम नव्या ठेकेदाराला देणार - खा. शिंदे SaamTvnews
मुंबई/पुणे

मलंगडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम नव्या ठेकेदाराला देणार - खा. शिंदे

ट्रॉलीकडे जाण्यासाठी ९ कोटींच्या रस्त्याचं भूमिपूजन...

प्रदीप भणगे

कल्याण : मलंगगड परिसराला इथल्या तीर्थक्षेत्रामुळे वेगळी ओळख आहे. सोबतच इथे असलेल्या गावांमध्ये मोठी लोकवस्ती आहे. त्या दृष्टिकोनातून या परिसराचा विकास करण्यासाठी शासनानं १५ कोटी २२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी (Shrikant Shinde) मोठा पाठपुरावा केला होता. या निधीपैकी ९ कोटी रुपये खर्चून फ्युनिक्युलर ट्रॉलीकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम केलं जाणार आहे.

हे देखील पहा :

तर, उसाटणे नाऱ्हेण चिरड शेलारपाडा रस्त्यासाठी ४ कोटी ६५ लाख, बक्तारशा दर्गा ते मलंगगड (Malanggad) पायऱ्यांसाठी १ कोटी, आंबे गावाजवळ साकव तयार करण्यासाठी ५७ लाखांचा निधी वापरला जाणार आहे. या सर्व कामांचं भूमिपूजन आज मलंगगडाच्या पायथ्याशी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ठाणे जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगरसेवक महेश गायकवाड, शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान मलंगगडावर जाण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या ठेकेदाराला टर्मिनेट करण्यात येणार आहे. मागील १० वर्षांपासून या ट्रॉलीचं काम अपूर्ण अवस्थेत सोडून देण्यात आलं असून त्यामुळं आता नव्या ठेकेदाराची नियुक्ती करत हे काम पूर्ण करून घेतलं जाणार आहे, असे खा.डॉ.शिंदे यांनी आज पत्रकाराशी बोलताना सांगितले.

आज खासदार शिंदे यांच्या हस्ते मलंगगड बस स्टॉप पासून फ्युनिक्युलर ट्रॉलीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. या कामासाठी ९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. दरम्यान, रास्ता तर होतोय, पण ट्रॉली कधी सुरू होणार? असा प्रश्न यावेळी खासदारांना विचारला असता, त्यांनी नवीन ठेकेदाराकडून (Contractor) हे काम करून घेणार असल्याची माहिती दिली.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport : सोलापूरकरांसाठी मोठी गुडन्यूज! 'या' तारखेपासून सुरू होणार विमानसेवा, मुंबई-गोव्याला काही तासात पोहचणार!

SCROLL FOR NEXT