Pune: बसमध्ये प्रवासा दरम्यान महिलेची झाली प्रसूती; मुलाला दिला जन्म मंगेश कचरे
मुंबई/पुणे

Pune: बसमध्ये प्रवासा दरम्यान महिलेची झाली प्रसूती; मुलाला दिला जन्म

पुणे जिल्ह्यातल्या (Pune District) पुरंदर तालुक्यात (Purandar) दिलासा देणारी घटना घडली आहे.

मंगेश कचरे

पुणे जिल्ह्यातल्या (Pune District) पुरंदर तालुक्यात (Purandar) दिलासा देणारी घटना घडली आहे. कर्नाटक येथील देवदुर्ग येथून पुणे येथे एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या महिलेची प्रवासा दरम्यान बसमध्येच प्रसूती झाली. प्रसूती नंतर ही महिला आणि तिच्या नवजात बालकाला नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. नवजात मुलाची तब्बेत चांगली असल्याचे नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रातून सांगण्यात आले आहे.

याबाबत प्रत्यक्षदर्शी सहप्रवाशांनी दिलेली माहिती अशी की, ज्योती सोमनाथ चव्हाण ही २० वर्षीय महिला पुणे येथील भोसरी येथे तिचा पतीसह राहते. ती बाळंतपणासाठी कर्नाटक मध्ये मानवी तालुक्यातील मुरामपूरतांडा येथे आपल्या वडिलांकडे गेली होती. तेथील डॉक्टरांनी प्रसूती सिजेरियन पद्धतीने करावी लागेल असे सांगितले होते. त्यामूळे तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे आणण्याच्या सल्ला तिच्या पतीने तिच्या वडिलांना दिला होता. काल रात्री ही बस देवदुर्ग येथून पुण्याकडे रवाना झाली. यामधून ही महिला प्रवास करीत होती. त्यावेळी तिला प्रसव काळा सुरू झाल्या होत्या.

सातारा जिल्ह्यातील लोणंदच्या पुढे आल्यावर नीरा जवळ तिला जास्तीचा त्रास होऊ लागल्याने बस मधील इतर महिलांनी पुढाकार घेऊन तिची प्रसूती केली. दरम्यान बस चालकाने १०८ ला फोन करून ॲम्बुलन्स बोलावली. यानंतर या महिलेला नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टर समीक्षा कांबळे यांनी महिलेवर उपचार केले. त्यांना ज्योती साळवे, योगिता टिळेकर यांनी मदत केली. यावेळी कर्नाटक परिवहन चे चालक वाहक व बस मधील प्रवाशांनी सहकार्य करून ही प्रसूती निर्धोकपणे पार पाडण्यास मदत केली. बसमधील सह प्रवाशी लक्ष्मी पवार, नागेश्वरी पवार, रिमा राठोड यांनी ही प्रसूती यशस्वी पणे केली आहे. सुखरूप पणे प्रसूती झाल्यानंतर सहप्रवाशांनी देखील आनंद व्यक्त केला. तब्बल दीड तास या प्रक्रियेमध्ये वेळ गेल्यानंतर देखील सहप्रवाशांनी कोणताही त्रागा न करता बस पुढील मार्गासाठी रवाना झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळ्यात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन

नवरात्रीत मुंबई लोकलमध्ये रंगला गरबा; लोकल ट्रेनमधील महिलांच्या गरब्याची सोशल मीडियावर चर्चा, पाहा व्हिडिओ

CJP Protest: आशुतोष रांका, सौरव दास यांच्या अडचणी वाढणार? ५ दिवस नाही तर २ ते ५ वर्षे होऊ शकतो तुरुंगवास, कायदेतज्ज्ञांनी काय सांगितलं?

Car tyre pressure: कारच्या टायरमध्ये किती PSI हवा असावी?

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना राज्य सरकारनं दिलं दिवाळीचं गिफ्ट; महायुती सरकारनं घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT