कल्याण रेल्वे परिसरातील घटना: चैन हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला महिलेने नागरिकांच्या मदतीने पकडले
कल्याण रेल्वे परिसरातील घटना: चैन हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला महिलेने नागरिकांच्या मदतीने पकडले प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

कल्याण रेल्वे परिसरातील घटना: चैन हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला महिलेने नागरिकांच्या मदतीने पकडले

प्रदीप भणगे

कल्याण : महिलेची चैन हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला महिलेने काही नागरिकांच्या मदतीने पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. उमाशंकर पांडे असे या चोरट्याच नाव असून कल्याण (Kalyan) जीआरपी पोलीस पुढील तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि लूटीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. विशेषतः रेल्वे परिसरात गुन्हेगारी वाढल्याने पोलिसांची (police) चिंता वाढली आहे.

हे देखील पहा-

चोरी आणि चैन स्नेचिंगच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या डझनभर चोरट्याना कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. मात्र त्यानंतर ही चोऱ्या सुरूच आहेत, अशीच एक घटना सोमवारी दुपारी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये घडली आहे. उल्हासनगर (Ulhasnagar) मध्ये राहणाऱ्या वॉलसमा जॉर्ज ही महिला काल दुपारच्या सुमारास रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून जात असताना एका चोरट्याने त्याचा पाठलाग केला. संधी साधून जॉर्ज यांच्या गळ्यातील महागडी चैन हिसकावून चोरट्याने पळ काढला.

जॉर्ज यांनी आरडा- ओरड करत चोरट्याचा पाठलाग सुरु केला. काही नागरिकांच्या मदतीने या चोरट्याला पकडून कल्याण जीआरपीच्या (GRP) ताब्यात दिले आहे. याप्रकरणी कल्याण जीआरपीने गुन्हा दाखल केला आहे. उमाशंकर पांडे असे या चोरट्याच नाव आहे. याबाबत कल्याण जीआरपीच्या पोलीस अधिकारी अर्चना दुसाने यांनी सांगितले की पांडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात याआधी देखील एक गुन्हा दाखल आहे. याआधी त्याने आणखी चोऱ्या केले आहेत का? याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पुण्यात मतदानाच्या दिवशी सर्व आठवडी बाजार बंद राहणार

Madhya Pradesh Crime: वाळू माफियांनी पोलीस अधिकाऱ्याला ट्रॅक्टरने चिरडलं, परिसरात दहशतीचं वातावरण

Relationship Tips : वेळीच नाही बोलणे शिकून घ्या; आयुष्यभर आनंदी रहाल

Petrol Diesel Rate (6th May 2024): निवडणूक काळात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट? जाणून घ्या राज्यातील आजचा भाव

Sambhajinagar Accident : लग्न सोहळ्याहून परत येताना आई-मुलावर काळाचा घाला; टेम्पोची दुचाकीला धडक

SCROLL FOR NEXT