पतीच्या अफेअरचा शोध घेण्यासाठी केला GPSचा वापर; हॉटेलमध्ये पकडले रंगेहाथ Saam TV
मुंबई/पुणे

पतीच्या अफेअरचा शोध घेण्यासाठी केला GPSचा वापर; हॉटेलमध्ये पकडले रंगेहाथ

मिटिंगसच्या नावाने आपला पती वेगवेगळ्या शहरात फिरतो असं आरीफच्या पत्नीला वाटायचं.

गोपाल मोटघरे

पुणे: आपल्या पतीचे विवाहबाह्य संबध शोधण्यासाठी एका पत्नीने चक्क GPS ट्रॅकरचा उपयोग केला. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. तर असं घडलंही आहे आणि संबधीत पती विरुद्ध पोलिसांनी गुन्हेही दाखल केले आहेत. विवाहबाह्य संबध ठेऊन तुम्ही आपल्या पत्नीला फसवत असाल तर ही बातमी नीट बघा. कारण आरिफ मांजरा नामक एका बड्या उद्योजकाने असंच धाडस केलं, मात्र त्याच्या हुशार पत्नीने त्याला रंगेहात पकडलं. थेट पोलिसात गुन्हा दाखल करत नवऱ्याच्या कारनाम्याचे बिंग फोडलं, मात्र, हे करण्यासाठी तिने तंत्रज्ञानाचा वापर केला. मिटिंगसच्या नावाने आपला पती वेगवेगळ्या शहरात फिरतो असं आरीफच्या पत्नीला वाटायचं. मात्र आरीफच्या वागण्यातील बदल तिला खटकू लागला, मग तिने एक शक्कल लढवली आणि आरीफच्या गाडीत चक्क GPS च बसवलं. 

आरिफ आणि त्याची पत्नी मूळची गुजरातचे रहिवासी आहेत. मात्र, आरिफ आपल्या पत्नीला खोटं बोलून नेहमी पुण्याला यायचा हे GPS ट्रॅकरवरून तिच्या पत्नीला लक्षात आलं. आणि मग जिथे आरीफची गाडी मुक्कामाला थांबलीय त्या हॉटेलचा पत्ता तिने काढला आणि मग हॉटेलच्या मॅनेजरला फोन करून तिने आरिफ सोबत कोण आहे? असे विचारलं तेव्हा तिला धक्काच बसला कारण मॅनेजर तिला म्हणाला की आरिफ सोबत त्याचीच पत्नी आहे. मात्र, प्रत्यक्षात आरिफ सोबत त्याची मैत्रीण मेघा सोंडी होती. ही बाब लक्षात येताच तिने पुणे गाठलं आणि हॉटेल मधील आपल्या नवऱ्याचे परस्त्री सोबतचे CCTV फुटेज मिळवून थेट पोलीस स्टेशन गाठलं. कोरोनाच्या काळात गृहकलह आणि घटस्फोट घेणाऱ्यांच्या प्रकरणात प्रचंड वाढ झाली आहे. एकमेकांवर नसलेला विश्वास हे त्या मागचं मुख्य कारण असल्याचं मत विधिज्ञानी व्यक्त करत आहेत.

अर्थातच लग्ना नंतर आपला जोडीदार आपल्याशी प्रामाणिक राहावं हे प्रत्येकाला वाटतं ,मात्र दोघांपैकी एक कुणालाही फसवत असेल तर आरिफच्या पत्नीने लढवलेली शक्कल इतरांच्या कामाला येऊ शकते. मात्र पती-पत्नीमध्ये निरंतर संवाद असेल आणि दोघांच्या नात्यात विश्वास असेल तर अशी वेळच येणार नाही.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

शिंदेसेना मंत्रिपदाची भाकरी फिरवणार? दसऱ्यानंतर शिंदेसेनेत फेरबदलाचे संकेत

SCROLL FOR NEXT