गाडी थांबवली म्हणून वाहतूक पोलिसाला दगडाने मारले प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

गाडी थांबवली म्हणून वाहतूक पोलिसाला दगडाने मारले

कल्याण पश्चिमेकडील शहाड पुलाजवळ पोलिसांची नाकाबंदी सूरु असून आज सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास वाहतूक पोलीस कर्मचारी प्रकाश पटाईत या ठिकाणी कर्तव्य बजावत होते.

प्रदीप भणगे

कल्याण : कल्याण शहरात विना हेल्मेट फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई सुरु असून आज कारवाई दरम्यान एका दुचाकीस्वार युवकाला हेल्मेटसंबंधी विचारणा करण्यासाठी थांबवले असता कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला दगडाने मारहाण झाल्याची धक्कादायक घटना आज कल्याण शहरात घडली आहे.

हे देखील पहा -

कल्याण पश्चिमेकडील शहाड पुलाजवळ पोलिसांची नाकाबंदी सूरु असून आज सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास वाहतूक पोलीस कर्मचारी प्रकाश पटाईत या ठिकाणी कर्तव्य बजावत होते. विना हेल्मेट फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई सुरू होती. यावेळी राहुल रोकडे नावाचा तरुण भरधाव वेगाने दुचाकी घेऊन जात होता.

पटाईत यांनी त्याची गाडी थांबवली, मात्र राहुल कट मारत तेथून निघून गेला. काही अंतरावर गाडी लावून काही क्षणातच राहुल परत आला. त्याने पटाईत यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्या डोक्यात दगडाने मारहाण केली. या हल्ल्यात पटाईत जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी राहुल रोकडे याला ताब्यात घेतलं आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Free Drink : शुगर फ्री ड्रिंक डायबिटीज रूग्णांसाठी हानिकारक की फायद्याचे?

Maharashtra News Live Update: बेळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा अडवला

Honey Tea : मधाच्या चहाचे ७ फायदे वाचून तुम्ही आजपासून प्यायला सुरुवात कराल, दूध-साखरेचा चहा विसराल

Rasgulla Recipe: गोड खायला आवडतं? मग घरच्या घरी बनवा रसाळ रसगुल्ले, वाचा सोपी रेसिपी

Madhuri Dixit: धकधक गर्लचा जलवा; माधुरी दीक्षितचा निळ्या साडीतील दिलखेचक लूक व्हायरल

SCROLL FOR NEXT