ऑक्सीजनचं गाव | नांदेडमधील 'या' गावात कडू लिंबाचं झाड कधीच तोडलं जात नाही

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील गुंडा नागबर्डी हे नागदेवतेचं गाव आहे. शेकडो वर्षांपासून या गावातील अंगणात, शेतात कुठेही कडू लिंबाचं झाड कधीच तोडलं जात नाही.
ऑक्सीजनचं गाव | नांदेडमधील 'या' गावात कडू लिंबाचं झाड कधीच तोडलं जात नाही
ऑक्सीजनचं गाव | नांदेडमधील 'या' गावात कडू लिंबाचं झाड कधीच तोडलं जात नाहीसंतोष जोशी
Published On

नांदेड : हिरवा गार शालू पांघरलेल्या नांदेडमधील (Nanded) या गावात कडू लिंबाची झाडं (Bitter lemon tree) कधीचं तोडली जात नाही. वाळलेली झाडं जळतंन किंवा इतर कुठल्याही कामासाठी वापरली जात नाही. यामुळे गावात नैसर्गिक ऑक्सीजन (Natural Oxygen) मोठ्या प्रमाणात मिळतो. मराठवाड्यातल्या या ऑक्सीजनच्या गावाची काय आहे परंपरा? सविस्तर वाचा... (Village of Oxygen|Bitter lemon tree is never cut down in gunda nagbardi village in Nanded)

हे देखील पहा -

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील (Loha Taluka) गुंडा नागबर्डी (gunda nagbardi) हे नागदेवतेचं गाव आहे. याठिकाणी नागदेवतेचं मंदिर (nagbardi temple) असून नागपंचमीला मोठी जत्रा भरते. शेकडो वर्षांपासून या गावातील अंगणात, शेतात कुठेही कडू लिंबाची झाडं कधीचं तोडली जात नाहीत. लिबांच झाड तोडलं किंवा ते वापरात आणलं तर काही तरी अघटीत घडतं, कुटुंबातील लोकांना त्रास होतो अशी धारणा या गावातील लोकांची आहे. लिंबाचं झाड शेतात वाळून जरी पडलं तरी शेतकरी झाड उचलत नाहीत, ते बाजूने पेरणी करतात.

नागपंचमीला नागबर्डीत दर्शनासाठी तेलंगणा, कर्नाटक या राज्यांतून भाविक मोठ्या प्रमाणात येतात. दोन वर्षांपासून कोरोनामुळे ही यात्रा रद्द केली आहे. मात्र, आजच्या दिवशी गावातून लग्न होऊन गेलेले मुलं, मुली कुटुंबासह कुठेही असतील तर ते दर्शनासाठी आवर्जून येतात. गावात नागपंचमीला उकडीचंच जेवण केलं जातं. गावात कधीही साप किंवा नाग निघाला तर मारलं जात नाही, गावातील मुलं डब्बे वाजवत नाग किंवा सापाला हुसकावून लावतात.

ऑक्सीजनचं गाव | नांदेडमधील 'या' गावात कडू लिंबाचं झाड कधीच तोडलं जात नाही
'साम'च्या बातमीचा इम्पॅक्ट; अखेर 'त्या' जमिनी महाराष्ट्र शासनाच्या नावावर

नागबर्डी प्रमाणे पंचक्रोशीतही ही अनोखी प्रथा आजही पाळली जाते. कडू लिंबाची झाडं न तोडण्यानं परिसर तर हिरवागार राहतोच मात्र, परिसरात प्रदुषण कमी होऊन ऑक्सीजन मोठ्या प्रमाणात मिळतं. त्यामुळे वृक्षाची खुलेआम कत्तल करणाऱ्यांनी नागबर्डी गावानं जोपासलेली परंपरा जपावी, म्हणजे निसर्गाचा ऱ्हास होणार नाही आणि ग्लोबल वाॅर्मिंगचा धोकाही कमी होईल.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com