Pune School Saam TV
मुंबई/पुणे

भयंकर! फी न भरल्यानं विद्यार्थ्याला ५ तास खोलीत कोंडलं; पुण्यातील धक्कादायक घटना (पाहा Video)

सदरचा विद्यार्थी वर्गात जाताच कर्मचाऱ्यांनी त्याला खेळणी व पुस्तके असलेल्या दुसऱ्या खोलीत नेले आणि खोलीला कुलूप लावले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

पुणे : पुण्यात शाळेची फी (School Fees) भरली नाही म्हणून इयत्ता ४ थीच्या वर्गात शिकणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थ्याला एका खोलीत कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोप पालक रमेश शाहू यांनी केलाय. ४ एप्रिल रोजी ही धक्कादायक घटना घडली. कोठारी इंटरनॅशनल शाळेच्या (Kothari International School कर्मचाऱ्यांनी रमेश साहू यांच्या पाल्याला कोंडल्यानंतर शाळेचे कर्मचारी ईतके असंवेदनशील वागतात कसे? असा प्रश्न साहू यांनी विचारला. पालक रमेश साहू यांनी शाळेविरोधात तक्रार केली मात्र, शाळाप्रशासाने आरोपांचे खंडन केले. सामची टीम शाळेत (School) पोहचल्यानंतर शाळा प्रशासनाने कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.

कोरोनानंतर शाळा पुर्ववर्त सुरू झाल्यानंतर ४ एप्रिल ही घटना घडली आहे. सदरचा विद्यार्थी वर्गात जाताच कर्मचाऱ्यांनी त्याला खेळणी व पुस्तके असलेल्या दुसऱ्या खोलीत नेले आणि तेथे त्याला कुलूप लावले. मुलाने दार वाजवून मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, कोणीही मदतीला आलं नाही. जवळपास पाच तास या मुलाला कोंडून ठेवल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

मुलाच्या वडिलांनी सांगितले की, मुलाची फी भरायला उशिर झाल्याने त्याला वर्गात जाऊ दिले जाणार नाही, असा फोन आल्यानंतर ते शाळेत गेले. ते शाळेत पोहचले असता त्यांना मुलाला घेऊन जाण्यास सांगण्यात आले. तसंच मुलाला शाळेतून आणण्यासाठी गेले असता ही घटना उघडकीस आली.

हे देखील पहा -

दरम्यान, त्यांनी शाळा प्रशासनाशी बातचित केली तेंव्हा, एकतर फी भरा किंवा शाळा सोडल्याचा दाखला घ्या असे सांगितलं असल्याचे पालक म्हणाले तसंच “त्यांनी मला सांगितले की त्यांनी अनेक ईमेल पाठवले आहेत पण त्यांच्याकडे माझा ईमेल आयडी नसल्याने ते मला दाखवू शकले नाहीत”, असही पालकांनी सांगितंलं.

मात्र, शाळा प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शाळेत असा कोणताही प्रकार घडला नाही. आम्ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांशी प्रेमाने वागतो, आणि कोणीही खोलीत बंद किंवा उपाशी नव्हते. ज्या पालकांनी हे दावे केले आहेत त्यांनी शाळा सोडल्याचा दाखला मागितला होता तो त्यांना दिला आहे असं ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT