School Reopen: राज्यात सोमवारपासून शाळा होणार, महाविद्यालये कधी? Saam TV
मुंबई/पुणे

School Reopen: राज्यात सोमवारपासून शाळा होणार, महाविद्यालये कधी?

राज्यभरातील शाळा सुरू व्हाव्यात यासाठी मेस्टाचे अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक, सुशांत सावंत

मुंबई: राज्यात महाविद्यालय सुरू करण्याचे संकेत मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. महाविद्यालय सुरू करण्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचे सामंत म्हणाले तसा प्रस्तावही मुख्यमंत्र्यांकडे पठवणार असल्याचे उदय सामंत म्हणाले. त्याचबरोबर राज्यातील शाळा येत्या 24 तारखेपासून सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ज्याठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे तिथे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक प्रशासनाला आम्ही शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. काळजी घेऊनच शाळा सुरू कराव्या अशी मी विनंती करत असल्याचे वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) म्हणाल्या.

दरम्यान राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढत असताना आणि तिसऱ्या लाटेचा धोका पाहता राज्यातील महाविद्यालये आणि शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अनेक शाळांमध्ये विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली होती. आता राज्यात स्थानीक परिस्थीती पाहून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर महाविद्यालयांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

राज्यभरातील शाळा सुरू व्हाव्यात यासाठी मेस्टाचे अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. मेस्टाने वारंवार सरकारकडे शाळा सुरु करण्याबाबत मागणी केली आहे.17 तारीखेपर्यंत सरकारने निर्णय घेतला नाही तर आम्ही शाळा सुरू करू असे सरकारला सांगितले होते. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील साडे 12 हजार शाळा सुरू केल्या आहेत. राज्यातील 18 हजार शाळा आम्ही सुरू करू असे संजय तायडे पाटील यांनी सांगितले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदानाच्या आदल्या दिवशीच शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक; तोडफोडही केली, भाजपवर आरोप

Viral Video: चालत्या बाईकवर मारहाण! पत्नीने 27 सेकंदात पतीला १४ वेळा लगावल्या कानाखाली

Municipal Election : मतदानाआधी जिथं-तिथं पैशांचा पाऊस, VIDEO

Maharashtra Live News Update: मकर संक्रांति निमित्त औंढा नागनाथ मंदिरात महिलांनी वान दिले

महापालिका मतदानापूर्वीच खळबळ; शेकडो मतदान कार्डांचा ढीग आढळला, निवडणूक अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT