MVA Goverment Saam TV
मुंबई/पुणे

लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ राज्यात पुकारलेल्या बंदवर राज्य सरकार म्हणालं...

महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंद हा सरकारमधील घटक पक्षांचा होता त्याला राज्य सरकारचा म्हणता येणार नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : लखीमपूर (Lakhimpur) घटनेच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबरला महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंद हा सरकारमधील घटक पक्षांचा होता त्याला राज्य सरकारचा म्हणता येणार नाही 'तो' महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) आम्ही पुकारलाच नव्हता असा दावा महाविकास आघाडी सरकारच्यावतीनं आज हायकोर्टात केला आहे.

राज्य सरकारनं मंत्रीमंडळ बैठकीत लखीमपूर घटनेत बळी पडलेल्या शेतकऱ्यांना फक्त श्रद्धांजली वाहिली होती. त्यामुळे तो बंद राज्य सरकारनं पुकारला होता असा आरोप करणं चुकीचं असल्याची भूमिका राज्य सरकारच्यावतीनं हायकोर्टात घेण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) सीमेवरील शेतकरी आंदोलनादरम्यान लखीमपूर खेरीमध्ये भाजपच्या मंत्र्यांच्या मुलानं त्याच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात राज्य सरकारच्या वतीने 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.

या बंदमुळे राज्यात झालेली 3 हजार कोटींची नुकसानभरपाई राज्य सरकारकडनं वसूल करण्याची मागणी करत आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांच्यासह अन्य दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती आणि त्याबाबतची सुनावणी आज झाली.

या सुनावणी वेळी राज्य सरकारने तो बंद सरकारचा नव्हता तर सरकारमधील घटक पक्षांचा होता असं राज्य सरकारने उच्च न्यायालयत स्पष्ट केलं आहे तर राज्य सरकारच्या निर्देशांनुसारच बंदनिमित्त बंदोबस्त लावला होता, त्यामुळे त्यांना बंदसाठी दोषी धरता येणार नाही असं मुंबई पोलीस (Mumbai Police) यांनी न्यायालयात सांगितलं. मात्र संधी देऊनही कुठल्याही राजकीय पक्षानं याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर न केल्याची नोंद घेत हायकोर्टानं या याचिकेवरील सुनावणी 20 जूनपर्यंत तहकूब केली आहे.

Edited By - Jadgish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy fruit: सफरचंद नाही तर 'हे' 1 फळं खाऊन तुम्ही राहाल डॉक्टरांपासून दूर

Gold Price Today : आठवडाभरात सोन्याच्या दरात मोठी उसळी, मुंबईत २४ कॅरेट सोन्याच्या भाव ₹१,४४,९३० तोळा, वाचा ताजे दर

Maharashtra News Live Update: बीड पोलिसांना 112 वर खोटा फोन करणाऱ्या दोघांवर गुन्हा

Shocking : मुंबई हादरली! प्रसिद्ध हॉटेलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार; बिझनेसमनला बेड्या

Hair Care Tips : तिशीतच केस पांढरे होत आहेत, काळेभोर केस या करण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करा

SCROLL FOR NEXT