Eknath Shinde, Uddhav Thackeray  Saam Tv
मुंबई/पुणे

शिवसेना पक्ष आम्ही वाढवला तो आमचाच; ठाकरेंच्या मुलाखतीनंतर शिंदे गटातील आमदाराच वक्तव्य

'आम्ही पक्षासोबत राहून पक्ष वाढवला. पक्ष हा आमचाच आहे, आमचाच राहील.'

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : आम्ही पक्षासोबत राहून पक्ष वाढवला. पक्ष हा आमचाच आहे, आमचाच राहील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला आहे.

आज ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शिवसेना पक्षाचे मुखपत्र सामनासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांसह भाजपवरती जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी त्यांनी आपण आजारपणात असताना मोठ्या संख्येने लोक आपल्या प्रकृतीसाठी प्रार्थना आणि अभिषेक करत होते. पण असेही काही लोक होते जे अगदी उलट इच्छा करत होते. मी उभा राहू शकत नव्हतो, याचा काहींना आनंद झाला होता. माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरु होत्या," असा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

पाहा व्हिडीओ -

त्यांच्या या मुलाखतीनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून देखील प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. आम्ही दगा फटका आम्ही केला नाही. मात्र, आमदारांची काम होत नव्हती. आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगत होतो. एकनाथ शिंदे यांनी ही वारंवार उद्धव ठाकरे यांची भेट घेत होते. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी काम केली पण आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांकडे दुर्लक्ष केलं. आदित्य साहेब आज जसे फिरत आहेत तसे आधी फिरले असते तर ही वेळी आली नसती.

आम्हाला पाला पाचोळा म्हणतात, हे चुकीचे आहे. आम्ही पक्षासोबत राहून पक्ष वाढवला. पक्ष हा आमचाच आहे. आमचाच राहील. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे नेतृत्व मान्य केले असून धनुष्यबाण निशाणी या निवडणुकीत आम्हालाच मिळणार असल्याचा विश्वास देखील संदीपान भुमरे यांनी व्यक्त केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पीएमपीच्या बस डेपोत सुधारणा करा, पुण्याच्या आयुक्तांचे आदेश

Morning Heel Pain: सकाळी झोपेतून उठताच पायाचे तळवे दुखतायत? ‘या’ गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण; डॉक्टरांनी सांगितली कारणं

Wai Fort : कातळात कोरलेल्या पायऱ्या अन् भव्य डोंगररांग; वाईजवळ लपलाय खतरनाक किल्ला, चढाई पाहूनच उडेल धडकी

ज्येष्ठ समाजसेविका दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या मुलावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल; सामाजिक क्षेत्रात खळबळ

Marathi Actor : मराठमोळा अभिनेता लग्नाच्या ८ वर्षांनी झाला बाबा, PHOTO शेअर करत दाखवली मुलांची झलक

SCROLL FOR NEXT