Mumbai Accident: वाळूचा ट्रक रिक्षावर पलटला; एका तासाच्या प्रयत्नानंतर चालकाची सुखरुप सुटका Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Accident: वाळूचा ट्रक रिक्षावर पलटला; एका तासाच्या प्रयत्नानंतर चालकाची सुखरुप सुटका

मुंबईमधील जोगेश्वरी विक्रोळी रोडवर रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईमधील जोगेश्वरी विक्रोळी लिंकवरील रोडवर रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. वाळूनी भरलेला ट्रक (Truck) एका रिक्षावरच पलटी झाला आहे. अपघातामध्ये (accident) रिक्षासह ड्रायव्हर दोघे वाळूच्या खाली दबले गेले होते. घटनास्थळी स्थानिक नागरिक उपस्थित होते. पोलिस (Police) आणि नागरिकांच्या मदतीने वाळूखाली दबले गेलेल्या रिक्षा चालकाला बाहेर काढण्यात १ तासानंतर यश आले आहे.

हे देखील पहा-

रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्री १२ वाजेच्या सुमारास वाळूनी भरलेला ट्रक पवईकडे (Powai) भरधाव जात होता. मात्र, ट्रकचालकाला नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. ट्रक शेजारून रिक्षा जात होती. त्यावर ट्रक पलटी झाला आहे. या अपघातानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

घटनास्थळी उपस्थित स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने तासाभराच्या परिश्रमानंतर जेसीबी (JCB) आणि क्रेन मशिनद्वारे रिक्षाचालकाला बाहेर काढण्यात आले आहे. रिक्षाचालकाची प्रकृती चिंताजनक आहे. एकीकडे ऑटोचालकाची प्रकृती गंभीर असतानाच ऑटोरिक्षाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पन्नास हजार मताच्या फरकाने निवडून येणार-माधुरी मिसाळ

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

SCROLL FOR NEXT