दिव्यांग मुलांनी रचला रेकॉर्ड! 21 तासात रंगवल्या 5,555 पणत्या Saam tv
मुंबई/पुणे

दिव्यांग मुलांनी रचला रेकॉर्ड! 21 तासात रंगवल्या 5,555 पणत्या

दिव्यांग मुलांनी प्रत्यक्ष पणत्या रंगविण्यात सहभाग घेतला होता. कोरोना नंतरचा हा पहिलाच रेकाॅर्ड आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे: आज दीप अमावस्या असल्याने पुण्यात काल पासून प्रा फाऊंडेशन, अनादी. एक विचार आणि भारतमाता महिला मंडळ ट्रस्ट यांच्या सौजन्याने भारतमाता अभ्यासिका, पर्वती पायथा येथे सलग २१ तास ५५५५ पणत्या रंगवणे हा उपक्रम राबवण्यात आलाय एका वेळेस केवळ २० जणच पणत्या रंगवायला बसतील अशी अट या रेकॉर्ड मध्ये होती.

प्रा फौंडेशनच्या दिव्यांग मुलांनी २ लाख पणत्या रंगवून विकण्याची मोहीम स्वीकारली आहे. पणत्या रंगविण्याच्या उपक्रमात प्रत्यक्ष दिव्यांग मुले-मुली देखील सहभागी झाले आहेत. तब्बल ३ हजाराहून अधिक पणत्या रंगवून झाल्या आहेत .कोरोना कोरोना काळात दिव्यांग मुलांना नैराश्य निर्माण झालं होतं.

यातून बाहेर यावेत यासाठी हा उपक्रम घेण्यात आला होता. नैराश्याने आत्महत्या वाढलेल्या असताना दिव्यांग मुलांची ही प्रेरणा पाहून कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. रंगवलेल्या पणत्या नंतर दिव्यांग विद्यार्थी विकणार आहेत. पहिली पण ती आज दीप अमावस्या निमित्त दगडूशेठ अर्पण केली जाणार आहे. कोरोने काळातले हे पहिलंच रेकॉर्ड असल्याचं आयोजकांनी सांगितले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT