पानशेत पुरग्रस्तांच्या घरांचा प्रश्न मार्गी SaamTvNews
मुंबई/पुणे

पानशेत पुरग्रस्तांच्या घरांचा प्रश्न मार्गी

1961 ला पानशेत धरण फुटल्यानंतर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने पुण्यात आठ वसाहती तयार केल्या होत्या.

गोपाल मोटघरे

पुणे : पानशेत पूरग्रस्तांना त्यांची घरं कायमस्वरुपी मालकी हक्काने देण्यात यावी अशी अनेक दिवसाची मागणी रखडून होती. त्यासाठी विविध शासकीय स्तरावर पाठपुरावा देखिल करण्यात येत होता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यांनी 02 मार्च 2022 घेतलेल्या निर्णयामुळे पानशेत पुरग्रस्तांचा , घरांचा प्रश्न कायमचा स्वरूपी मार्गी लागला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पानशेत (Panshet Dam) पूरग्रस्तांना आता त्यांची घरं कायमस्वरूपी मालकी हक्काने मिळणार आहे. 

हे देखील पहा

अशी माहिती आज राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे पुणे महानगरपालिकेतील (PMC) नगरसेवक सुभाष जगताप आणि अश्विनी कदम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 1961 ला पानशेत धरण फुटल्यानंतर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने पुण्यात आठ वसाहती तयार केल्या होत्या. त्यात 2095 पूरग्रस्तांसाठी 103 गृहनिर्माण संस्था स्थापन करून पूरग्रस्तांना 99 वर्षाच्या करार पद्धतीने भूखंड देण्यात आले होते. 

मात्र, पूरग्रस्तांचे भूखंड कायमस्वरूपी मालकी हक्काचे नसल्याने पूरग्रस्तांना विकास काम करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. त्यांना बँकेकडून घर बांधकाम करण्यासाठी कर्ज देखील उपलब्ध होत नव्हतं. अशा विविध अडचणींना पानशेत पूरग्रस्त गेल्या काही वर्षापासून तोंड देत होते.  मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे तसेच पूरग्रस्तांच्या अडचणी त पूर्णपणे सोडविण्यात आल्या असा दावा सुभाष जगताप यांनी केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

SIR Update : SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार; जाणून घ्या A to Z माहिती

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची शिवतीर्थावर नेत्यांची बैठक

New Pension Rule: EPS पगार मर्यादा 25,000 रुपये; पण सर्वांनाच पेन्शन मिळणार नाही! जाणून घ्या नवे नियम

White Saree For Womens: महिलांसाठी पांढऱ्या रंगाच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स नवरात्रीसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT