पंतप्रधानांकडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा  Saam Tv news
मुंबई/पुणे

पंतप्रधानांकडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य आपल्यापर्यंत पोहचवण्याची त्यांची कला अतुलनीय आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदेरेंना (Babasaheb Purandare) १०० व्या वर्षांत पदार्पण केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बाबासाहेब पुरंदरे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बाबासाहेब आपल्या १०० वर्षात पदार्पण करत आहेत आणि आपला देशही ७५ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. हा योगायोगच म्हणावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chatrpati Shivaji Maharaj) जीवनकार्य आपल्यापर्यंत पोहचवण्याची त्यांची कला अतुलनीय आहे. महाराजांचे जीवन आपल्या सर्वांना प्रेरणादायी असेल. महाराजांचे जीवनकार्य आपल्यापर्यंत पोहचवण्याचे संपुर्ण योगदान बाबासाहेबांना जाते, असेही यावेळी नरेंद्र मोदी यांनी म्हटले. (The Prime Minister wished Shivshahir Babasaheb Purandare a happy birthday)

आज झालेल्या कार्यक्रमात 'महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान'चे विश्वस्त जगदीश कदम व 'शतकवीर पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सत्कार समारोह समितीच्या अध्यक्षा व लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यादेखील उपस्थित होत्या. विशेष म्हणजे आजच्याचदिवशी बाबासाहेब शंभराव्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने त्यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

हे देखील पहा -

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त पुण्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भाषणाची सुरवातही मराठीतून केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आपल्यापर्यंत पोहचवण्याबद्दल त्यांनी बाबासाहेबांचे मनापासून आभार मानले. गेल्या काही शतकांध्ये बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. तसेच त्यांनी यावेळी शिवाजी महाराज्यांचे शौर्य, पराक्रम आणि नौसेनेचे कार्याचाही यावेळी उल्लेख केला.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसाला मारहाण, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कॉलर पकडून ओढत नेलं अन्...

Akola Accident : अकोल्यात अपघाताची मालिका सुरूच, 2 दिवसात तिघांचा मृत्यू तर दोन जखमी

Maharashtra Live News Update: आरक्षणाच्या लढाईनंतर मनोज जरांगे नारायण गडावर

Bads Of Bollywood: शाहरुख खानपासून ते करण जोहरपर्यंत; आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणार फिल्म इंडस्ट्रीचा खरा चेहरा

जुना वाद टोकाला; व्यापाऱ्याची निर्घृण हत्या, गोळ्या झाडून संपवलं, मास्टरमाईंडसह ६ जण ताब्यात

SCROLL FOR NEXT