हृदयद्रावक ! नुकत्याच जन्मलेल्या नकोशीला गावाच्या बाजुला दिलं फेकून... रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

हृदयद्रावक ! नुकत्याच जन्मलेल्या नकोशीला गावाच्या बाजुला दिलं फेकून...

राज्यभरात स्त्रीशक्तीचा जागर होत असला तरी स्त्रीभ्रूणहत्या थांबलेल्या नाही. नुकत्याच जन्मलेल्या 'नकोशी' ला रस्त्यावर फेकल्या जात असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते. अशीच एक घटना खेड तालुक्यातील कोये गावात मध्यरात्री घडली आहे.

रोहिदास गाडगे

पुणे : राज्यभरात स्त्रीशक्तीचा जागर होत असला तरी स्त्रीभ्रूणहत्या थांबलेल्या नाही. नुकत्याच जन्मलेल्या 'नकोशी' ला रस्त्यावर फेकल्या जात असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते. अशीच एक घटना खेड Khed तालुक्यातील कोये गावात मध्यरात्री घडली आहे.

हे देखील पहा-

खेड तालुक्यातील कोये गावालगत नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे नवजात अर्भक सोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला पहाटेच्या सुमारास घडला आहे. बाजुलाच असणाऱ्या एका महिलेला बाळाचा आवाज आल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने बाळाला प्राथमिक उपचारासाठी पाईट येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल करण्यात आले. बाळाचे वजन 3 किलो असुन नुकतेच जन्मलेले आहे. त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन चाकण पोलीसांच्या मदतीने बाळाला पुढील उपचारासाठी पुण्याला पाठविण्यात आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

'नकोशी' रस्त्यावर फेकलेल्या अवस्थेत आढळली. काही तासांपूर्वीच जन्मलेली ही 'नकोशी' सुखरूप असली, तरी तिला निर्दयपणे गावाच्या बाजुला निर्जन ठिकाणी फेकल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

Edited by-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये वादळाने पडले विद्युत पोल

Pune Fort : त्रिकोणी आकाराचा सह्याद्रीतील किल्ला, अनुभवाल मावळच्या इतिहासाचा रोमांचक प्रवास

Shocking : बहीण-भावाच्या नात्याला काळिमा; घरात एकट्या असलेल्या १८ वर्षीय बहिणीवर चुलत भावानं केला बलात्कार

माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षात उभी फूट; 20 खासदारांनी बनवला वेगळा गट, लोकसभा अध्यक्षांना दिलं पत्र

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय नाहीतर...

SCROLL FOR NEXT