मंत्र्यांच्या बंगल्यांना आता गड-किल्ल्यांची नावे!
मंत्र्यांच्या बंगल्यांना आता गड-किल्ल्यांची नावे! SaamTvNews
मुंबई/पुणे

मंत्र्यांच्या बंगल्यांना आता गड-किल्ल्यांची नावे!

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्य मंत्री मंडळातील सर्व मंत्र्यांचे शासकिय निवासस्थान असलेल्या बंगल्यांना आता गड आणि किल्यांची नावं देण्यात येणार आहेत. राज्यभरातील शिवप्रेमींनी यासाठी सतत पाठपुरवठा केला होता. त्यांनी या संदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्याकडे प्रस्ताव दिला होता.

उदय सामंत यांनी या प्रस्तावावर सकारात्मक पाठपुरवठा केला आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अंतिम मंजुरीनंतर मंत्र्यांच्या शासकिय निवास्थानांचं नामांतर करण्यात आलंय. त्यामुळे आता मंत्र्यांच्या शासकिय निवास्थानांना राज्यातील प्रसिद्ध गड आणि किल्यांची नावं मिळणार आहेत.

पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या A6 बंगल्याला स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडचं नाव देण्यात आलंय. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या B2 बंगल्याला रत्नसिंधु नाव देण्यात आलंय.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा बहजत 'या' कारला आहे मागणी

Maharashtra Election: नाशकातून शिंदे गटाने तिकीट दिल्याचा दावा; कोण आहेत शांतीगिरी महाराज?

Toyota Rumion कार भारतात लॉन्च, मोठ्या फॅमिलीसाठी आहे बेस्ट; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Nandurbar News | हिना गावित आणि गोवाल पाडवींमध्ये लढत

धैर्यशील मोहिते पाटील यांनी विश्वासघात केला - फडणवीस!

SCROLL FOR NEXT