MPSC Student Protest In Pune SAAM TV
मुंबई/पुणे

Pune MPSC Students Protest : तब्बल १८ तासानंतर पुण्यातलं एमपीएससीच आंदोलन स्थगित

मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीच्या आश्वासनानंतर माघार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव

Pune News : राज्यातील विविध शहरांमध्ये काल एमएससीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा, या मागणीसाठी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. पुण्यातील अलका टॉकीज चौकात विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सुरू होते.

अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीच्या आश्वासनानंतर पुण्यातल्या (Pune) अलका टॉकीज चौकातलं आंदोलन विद्यार्थ्यांकडून स्थगित करण्यात आलेलं आहे. तब्बल १८ तासानंतर पुण्यातलं एमपीएससीच आंदोलन विद्यार्थ्यांनी स्थगित करण्याची घोषणा केली आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आहे. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांमध्ये भेट होणार आहे. आज पाच विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट घेत विद्यार्थी आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत. आंदोलन स्थगित म्हणजे स्वल्पविराम पूर्णविराम नाही अशा विद्यार्थ्यांच्या भावना आहे.

दरम्यान, आंदोलनस्थळी 300 ते 400 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अनेक तास उलटले तरी विद्यार्थी आंदोलन मागे घ्यायला तयार नव्हते. याबाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा या विद्यार्थ्यांनी घेतला होता. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या आश्वासनानंतर पुण्यातल्या अलका टॉकीज चौकातलं आंदोलन तब्ब्ल १८ तासांनी विद्यार्थ्यांकडून स्थगित करण्यात आलेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bangle Designs: नववधूच्या सौंदर्यात पडेल भर! 'या' ५ आहेत बांगड्यांच्या लेटेस्ट आणि युनिक डिझाइन्स

Mobile Battery Saving Tips: ...म्हणून तुमच्या मोबाइलची बॅटरी खटाखट उतरतेय, आताच ही सेटिंग बदला

Buldhana : डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं! कॉलेजला जातानाच १९ वर्षाच्या ॠतूजाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: महायुतीची ठाण्यात होणार आज बैठक; जागा वाटपांवर होणार चर्चा

Breakup Tips: पार्टनरला न दुखावता कसं कराल ब्रेकअप? या सोप्या टीप्स करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT