Prabodhankar Thackeray Sarovar  Saamtv
मुंबई/पुणे

Thane: CM शिंदेंच्या हस्ते लोकार्पण झाले अन् अवघ्या काही तासातचं...; लाखोंचा निधी वायफळ जात असल्याची रंगली चर्चा

स्मार्ट सिटीच्या निधीतून होत असलेल्या विकासकामांच्या दर्जाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजित देशमुख, कल्याण...

Prabodhankar Thackeray Sarovar: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल बुधवारी (दि. 15 फेब्रुवारी)रोजी सायंकाळच्या सुमारास लोकार्पण करण्यात आले. यामध्ये प्रबोधनकार ठाकरे सरोवर (शेनाळे तलाव) कोट्यावधीचा निधी खर्च करून नूतनीकरण आणि सुशोभिकरण करून मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होत्.

मात्र काही तासातच प्रबोधनकार ठाकरे सरोवरचे मुख्यप्रवेश दार तुटून पडले आहे. यामुळे स्मार्ट सिटीच्या निधीतून होत असलेल्या विकासकामांच्या दर्जाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. (Mumbai)

याबाबत अधिक माहिती अशी की, कल्याण पश्चिमेतील प्रबोधनकार ठाकरे सरोवर (काळा तलावाचे) कोटय़वधी रुपये खर्च करुन सुशोभिकरण झाले. बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते गाजावाजा करीत लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या चार तासानंतरच तलावाचे मुख्य प्रवेशद्वाराचा एक भाग अचानक तूटून खाली पडला.

घटनेच्या वेळी कोणी नसल्याने कुणाला दुखापत झाली नाही . मात्र प्रवेशद्वाराचा भाग तुटल्याने एकच खळबळ उडाली.कोट्यवधी रुपये खर्चून कामाच्या दर्जासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

गर्दीमुळे तुटले गेट..

याबाबत बोलताना स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे यांनी "सुशोभीकरणाच्या कामाचा दर्जा हा उत्तम आहे. त्याचा तपासणी अहवालही आमच्याकडे आला आहे. मात्र काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलेल्या लोकार्पण सोहळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या गर्दीचा ताण प्रवेशद्वारावरील गेटवर आल्याने प्रवेशद्वाराचा भाग तुटला," अशी माहिती दिली आहे.

तसेच या गेटची तात्काळ दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. तर दुसरीकडे लोखंडी गेट उभारणीसाठी वापरले लोखंड गंजलेल्या अवस्थेत असल्यानेच गेट तुटून पडले, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT