Mumbai: त्रास न होता मरण्याचे मार्ग सर्च केलं, Google ला समजलं, आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या २५ वर्षीय तरुणाचे 'असे' वाचले प्राण

तरुणाने गुगलवर सर्च केल्यानंतर सुत्रे हालली आणि मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे या २५ वर्षीय तरुणाचे प्राण वाचले.
Google and mumbai police save life
Google and mumbai police save lifeSaam Tv
Published On

सचिन गाड, मुंबई

Mumbai: नैराश्येतून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाचे प्राण वाचवण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. महत्वाचे म्हणजे या प्रकरणात गुगलने महत्वाची भूमिका बजावली आहे. त्रास न होता मरण्याचे मार्ग असे या तरुणाने इंटरनेटवर सर्च केले.

ज्यानंतर गुगलकडून (Google) हालचाली झाल्या आणि मुंबई पोलिसांच्या मदतीने या २५ वर्षीय तरुणाचे प्राण वाचले आहेत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेवू...

Google and mumbai police save life
Accident News: भरघाव टिप्परने दुचाकीस्वारांना उडवले; एकाच गावातील दोन तरुणांचा दुर्देवी मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित तरुण हा मुंबईमधील जोगेश्वरी मध्ये राहत असून तो आयटी इंंजिनिअर आहे. या तरुणाने मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक कर्ज घेतले होते. मात्र ते फेडता येत नसल्याने तो प्रचंड निराश झाला होता. याच नैराश्येतून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तो त्रास न होता मरण्याचे मार्ग असे इंटरनेटवर सर्च करत होता.

गुगलच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी इंटरपोलच्या मदतीने त्याची माहिती मुंबई पोलिसांना दिली. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ५ ने तात्काळ पावले उचलत जोगेश्वरी वरून या तरुणाला अवघ्या दोन तासात शोधून काढले.

Google and mumbai police save life
Crime News: धक्कादायक! जन्मदात्या बापानेच केली पोटच्या मुलाची गळा चिरुन हत्या, मृतदेह झोळीत नेतानाच...

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मुंबई पोलिसांच्या पथकाने या मुलाचे समुपदेशन केले आणि त्यानंतर त्याच्या आई वडिलांना बोलवून त्यांना देखील परिस्थितीची कल्पन देऊन मुलाला सुखरूप त्यांच्या ताब्यात देण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे या आधी दोन वेळ त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्या तरुणाने पोलिसांना सांगितले.

मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि इंटरनेटच्या साहाय्याने या तरुणाचे प्राण वाचले. यावेळी मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्त विवेक फणसाळकर यांनी देखील गुन्हे शाखा कक्ष ५ च्या टीमचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com