धक्कादायक : घर सोडून गेलेली बायको परत आली अन् नवऱ्याने पोलिस स्टेशनमध्येच आग लावून घेतली Saam Tv
मुंबई/पुणे

धक्कादायक : घर सोडून गेलेली बायको परत आली अन् नवऱ्याने पोलिस स्टेशनमध्येच आग लावून घेतली

एकत्रित कुटुंबात राहणाऱ्या या तरूणाचे पत्नीसोबत खटके उडत होते. दोन दिवसांपूर्वी पत्नी घरातून निघून गेल्याची तक्रार बुधवारी या सर्वजीतने ताडदेव पोलिस ठाण्यात केली.

सुरज सावंत

मुंबई : घर सोडून गेलेली पत्नी पोलिस ठाण्यात Police Stationआल्याचे कळताच तरूणाने पोलिस ठाण्यातच स्वत :ला पेटवून घेतल्याची घटना गुरूवारी ताडदेव पोलिस ठाण्यात (Taddev Police Station) घडली होती. या घटनेत सर्वजीत मोरे (Sarvajit More) या 32 वर्षीय तरुणाचा गुरूवारी रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सर्वजीतचे 2020 मध्ये लग्न झाले होते. एकत्रित कुटुंबात राहणाऱ्या या तरूणाचे पत्नीसोबत खटके उडत होते. दोन दिवसांपूर्वी पत्नी घरातून निघून गेल्याची तक्रार बुधवारी या सर्वजीतने ताडदेव पोलिस ठाण्यात केली.

हे देखील पहा -

पोलिसांनी पत्नीचा शोध घेत तिला ताडदेव पोलिस ठाण्यात जबाब नोंदवण्याचं काम सुरू होतं. याची माहिती मिळताच सर्वजीत हा पोलिस ठाण्यात आला. पोलिसांनी त्याची समज काढून त्याला पाठवले. मात्र काही वेळाने तो अंगावर राँकेल ओतून पोलिस ठाण्यात आला.

पोलिस त्याला रोखणार त्या आधीच त्याने स्वत:ला पेटवून घेतले. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्वरित त्याच्या अंगावरील आग विझवत. सर्वजीतला नायर रुग्णालयात दाखल केले. जखमी व्यक्ती हा ताडदेव पोलिस कॉलनीमध्ये राहण्यास असून सध्या त्याच्यवर नायर रुग्णालयातील Nair Hospital अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना सर्वजीतचा मृत्यू झाला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :चंद्रकांत पाटील ७ हजार मतांनी आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT