Pune Crime: फुकटात बिर्याणी न दिल्याने हॉटेल मॅनेजरवर कोयत्याने वार; तिघांवर गुन्हा दाखल Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: फुकटात बिर्याणी न दिल्याने हॉटेल मॅनेजरवर कोयत्याने वार; तिघांवर गुन्हा दाखल

हॉटेलमधून फुकट बिर्याणी न दिल्याच्या कारणावरून ३ तरुणांनी हॉटेल मॅनेजरवर कोयत्याने सपासप वार करत हल्ला केला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : हॉटेलमधून फुकट बिर्याणी Free biryani न दिल्याच्या कारणावरून ३ तरुणांनी हॉटेल Hotel मॅनेजरवर कोयत्याने सपासप वार करत attack हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये हॉटेल मॅनेजर गंभीर जखमी झाला असून हॉटेलचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. ही घटना घडल्यानंतर, हॉटेल चालकाने सिंहगड रोड पोलीस Sinhagad Road Police ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. संबंधित घटना शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे.

हे देखील पहा-

यामुळे रात्री उशिरापर्यंत परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता. या घटनेचा पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मण सोनवणे याचे पुण्यात हिंगणे खुर्द परिसरामध्ये स्वत:च्या मालकीचे हॉटेल आहे. संबंधित हॉटेलमध्ये बिरास्वर दास हे मॅनेजर म्हणून काम करत होते. शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास सोनवणे यांच्या हॉटेलवर ३ तरुण आले होते. संबंधित तरुणांनी हॉटेल मॅनेजर बिरास्वर दास यांच्याकडे फुकट बिर्याणी देण्याची मागणी केली. पण हॉटेल मॅनेजरने आरोपींच्या दबावाला न जुमानता, बिर्याणी देण्यास नकार दिला होता.

फुकट बिर्याणी देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून आरोपीने मॅनेजरवर कोयत्याने सपासप हल्ला चढविला आहे. या हल्ल्यामध्ये हॉटेल मॅनेजर बिरास्वर दास हे गंभीर जखमी झाले आहे. आरोपी तरुण एवढ्यावरच थांबले नव्हते. तर त्यांनी हॉटेलमधील अनेक वस्तूंची तोडफोड देखील करण्यात आली आहे. आरोपींनी मॅनेजरच्या हातावर कोयत्याने वार केल्यावर, काऊंटरवर असलेले कॉम्प्युटर आणि फ्रिजवर देखील कोयत्याने घाव घालत नुकसान करण्यात आले आहे.

ही घटना घडत असताना फिर्यादी हॉटेल मालक लक्ष्मण सोनवणे बाहेर उभे होते. भांडणाचा आवाज आल्यावर ते धावत हॉटेलमध्ये गेले. याप्रकरणी हॉटेल चालकाने बाळा, तेजा आणि सत्या वानखेडे या ३ तरुणांविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: ठाणे-सीएसएमटी लोकल बंद

Majalgaon Dam : माजलगाव धरण ५६ टक्के भरले; बीडसह माजलगावची पाण्याची चिंता मिटली

EPFO: पीएफचे पैसे कधी आणि कसे काढू शकतात? EPFO चा नियम काय सांगतो

Mumbai Crying Club: मुंबईमध्ये सुरु झाला पहिला 'क्रायिंग क्लब'; तणावापासून मुक्तता मिळवण्यासाठी घेतली जाते जपानच्या प्रथेची मदत

Mumbai Rain : पावसाचा हाहा:कार! मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, एलबीएस मार्ग बंद, कुर्लामध्ये कमरेइतके पाणी; धडकी भरवणारा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT