Aaditya Thackeray Latest News Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: हे सरकार निवडणूक घेण्यासाठी घाबरतंय; आदित्य ठाकरेंचा घणाघात

Aaditya Thackeray Latest News : ज्या नगरविकास मंत्र्यांनी नवीन वार्ड रचना जाहीर केली होती, त्याच नगरविकास मंत्र्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ती वार्ड रचना रद्द केली.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेना (Shivsena) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुंबईतील विभागवार शाखांचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. आज, गुरुवारी पहिल्या दिवशी भायखळा, वरळी आणि प्रभादेवीमधील काही शाखांमध्ये भेटी देऊन शाखा प्रमुख, विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन आदित्य ठाकरे यांनी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच शाखांमधल्या कामकाजाचा आढावा घेतला. मुंबईतील इतरही शाखांमध्ये अशा भेटी पुढे आदित्य ठाकरे देणार आहेत. (Aditya Thackeray Latest News)

हे देखील पाहा -

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना आदित्य ठाकरेंनी मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांनी आवाहन केलं की, 'आपण केलेली कामं घरा-घरापर्यंत, मतदारांपर्यंत आणि जनतेपर्यंत पोहोचवा आणि केलेल्या कामाची माहिती द्या. नवीन मतदार यादीत मतदार राजाची नोंद वाढवा. "तसंच हे सरकार बेकायदेशीर आहे, हे सरकार पडणार. त्यामुळे आपण केलेल्या कामाची पोचपावती घरा-घरापर्यंत पोहोचवा आणि मतदार राजाला जागृत करा असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच "हे सरकार निवडणुकीला घाबरतंय, ज्या नगरविकास मंत्र्यांनी नवीन वार्ड रचना जाहीर केली होती, त्याच नगरविकास मंत्र्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ती वार्ड रचना रद्द केली, त्यामुळे हे सरकार निवडणुकीला घाबरलंय असा घणाघात त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली उज्वल निकम यांची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सरकारी वकील उज्वल निकम यांनी आज नंदवन बंगल्यावर जाऊन भेट घेतली. 20 मिनिटांच्या या भेटीत सध्या सत्तास्थापणेबाबत जो घटनात्मक पेच निर्माण झाला आहे, यावर मुख्यमंत्री आणि उज्वल निकम यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. न्यायालयातील सुनावणी सुरू असताना मीडियासमोर कायदे तज्ञ म्हणून सरकारी वकील वारंवार भूमिका मांडतांना पाहायला मिळत होते. अर्थात न्यायालयीन लढाई अधिक किचकट होत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वकील उज्वल निकम यांच्याकडून काही सल्ला घेतल्याची माहिती आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यापुढे बोलताना काळजी घेईल, कोकाटेंचे स्पष्टीकरण

Maharashtra Politics : माणिकराव, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, अजित पवारांकडून राजीनाम्याचे संकेत

Sanjay Dutta Education: शिक्षण अर्धवट सोडले अन् अभिनयाचे गिरवले धडे; संजय दत्त किती शिकलाय?

Nashik To Akkalkot: गुड न्यूज! ६ राज्यांमधून जाणार महामार्ग, नाशिक ते अक्कलकोट ४ तासांत पोहचता येणार; ही शहरं येणार जवळ

Akkalkuwa News : प्रसूतीसाठी झोळीत टाकून पायपीट; रस्त्याअभावी रुग्णालयात पोहचणे अशक्य, माघारी फिरत घरीच प्रसूती

SCROLL FOR NEXT