पिंपरी-चिंचवडच्या बाप-लेकिने सर केला माउंट एलब्रूस  saam tv news
मुंबई/पुणे

पिंपरी-चिंचवडच्या बाप-लेकिने सर केला माउंट एलब्रूस

गिरीजा लांडगे आणि धनाजी लांडगे अस माउंट एलब्रूस शिखर सर करणाऱ्या बाप लेकीचं नाव आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गोपाल मोटघरे

महाराष्ट्रासह देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी पिंपरी - चिंचवडच्या बाप - लेकिनी केली आहे.  युरोप खंडांतील सर्वात उंच समजल्या जाणाऱ्या माउंट एलब्रूस हा पर्वत शिखर पिंपरी - चिंचवडच्या भोसरी परिसतात राहणाऱ्या बाप लेकीने यशस्वी सर केलाय. गिरीजा लांडगे आणि धनाजी लांडगे अस माउंट एलब्रूस शिखर सर करणाऱ्या बाप लेकीचं नाव आहे. (The father and daughter of Pimpri-Chinchwad climbed Mount Elbrus)

हे देखील पहा-

अगदी 12 वर्षाच्या वयात गिरिजा ने आपले वडील धनाजी  सोबत माउंट एलब्रूस शिखर सर केलाय. माउंट एलब्रूस शिखर हा 5 हजार 642 मीटर उंची आहे. या पर्वताला निद्रिस्त ज्वालामुखी म्हणून ही ओळखले जाते. माउंट एलब्रूस पर्वत शिखरावर तापमान उणे 25 ते 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली असते. प्रंचड थंडी आणि वाऱ्याचे घोघावनारे झोताचा सामना करत गिरीजा आणि धनाजी यांनी माउंट एलब्रूस सर केला आहे. माउंट एलब्रूस वर भारतीय झेंडा फळकवून गिरीजा आणि धनाजी यांनी लेक वाचवा- लेक जगवा असा संदेश दिला आहे. 

गिरीजा लांडगे ( गिर्यारोहक )

माउंट एलब्रूसची उंची 5 हजार 642 मीटर एव्हढी आहे. हे शिखर सर करण्यासाठी प्रत्येक गिर्यारोहकाला तशी तयारी करावी लागते. मात्र महाराष्ट्रात कुठंही बर्फाळ पर्वत नसल्याने गिरीजाला तसा सराव करता आला नाही. मग तिने आपल्या पायाला वजन बांधून आणि पाठीवर वजन घेऊन डोंगरावर चढण्याचा सराव केला.  अर्थातच  सह्याद्रीसारखा भक्कम आधार म्हणून मागे उभ्या असलेल्या बाबाच्या हिमतीवर गिरीजाने ही मोहीम फत्ते केली 

धनाजी लांडगे ( गिर्यारोहक ) 

गिर्यारोहण करणे हा तसा अत्यंत साहसी आणि तितकाच धोकादायक क्रीडा प्रकार आहे. त्यामुळे गिरीजाला गिर्यारोहण करण्यास तिच्या आईने कधीच थांबविल नाही. उलट तिला गिर्यारोहण करण्यास सदैव तिच्याआईनेही पाठिंबा दिलाय.

सारिका लांडगे (गिरीजाची आई ) 

गिरीजाने आत्तापर्यंत लिंगाणा, वजीर, तैलबैल, नागफणी, कळकराय, संडे-१, संडे-२, वानरलिंगी असे अवघड सुळके सर केले आहेत. त्याबरोबर नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील 65 किल्लेही पादाक्रांत केले. आता  तिचं या पुढील ध्येय माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं आहेआणि ते स्वप्नही ती लवकरच नक्कीच पूर्ण करेल.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

Deepa Parab: मन झालं बाजिंद, ललकारी ग...

SCROLL FOR NEXT